पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥२०॥ इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्ने श्रीकृष्णार्जुन- संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥ (२०) वर सांगितलेला हा अमृततुल्य धर्म मत्परायण होस्साते श्रद्धेने जे आचरितात ते भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. । [भक्तिमान ज्ञानी पुरुष सर्वात श्रेष्ट असें जें पूर्वी वर्णन आले आहे (गी. ६.४७,७.१८) त्या वर्णनाला अनुसरून भगवंतांनी आपणाला अत्यंत प्रिय कोण याचे म्ह० परम भगवद्रक कर्मयोग्याचे या श्लोकांत वर्णन केले आहे. पण गी. ९.२९ या श्लोकांत भगवानच "मला सर्व सारखे, अमुक प्रिय व अमुक द्वेष्य नाही" असे सांगतात. दिसण्यात हा विरोध आहे असा भास होतो; पण एक वर्णन सगुणोपासनेचे किंवा भक्तिमार्गातले, आणि दुसरे अध्यात्म दृष्टया किंवा कर्मविपाकदृष्टया आहे, लक्षांत आणिलें म्हणजे हा विरोध रहात नाही. गीतारहस्याच्या तेराव्या प्रकरणाच्या अखेरीस (पृ. ४२७ व ४२८) यासंबंधी विवेचन केले आहे ते पहा. याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाइलेल्या म्हणजे सांगितलेल्या पनिष. त ब्राह्मविद्यान्तर्गत योग-हणजे कर्मयोग-शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जन यांच्या संवादांतील भक्तियोग नांवाचा बारावा अध्याय समाप्त झाला. अध्याय तेरावा. [अनिर्देश्य व अव्यक्त परमेश्वराचे (खुद्रीने) चिंतन करून अखेर मोक्ष मिळतो जरी खरे आहे. तरी त्यापेक्षा देने परमेश्वराच्या प्रत्यक्ष बध्यक्त स्वरूपाची भक्ति करून परमेश्वरार्पण बुद्धीने सर्व कर्मे करीत गेल्याने तोच मोक्ष लभ गतीने मिळतो असे गेल्या अध्यायांत सिड