पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- - - - गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १२. २५५ 95 ये तु धामृतमिदं यथोक्तं पर्युपासते।.. आहेत. 'आश्रय' व 'निकेत' या दोन शब्दांचा अर्थ एकच आहे. म्हणून अनिकेत म्ह० घरदार सोडणारा असा अर्थ न करितां, गृहा- दिकांचे ठायीं ज्याच्या मनाचें बिहाड गुंतून राहिलेले नाही असा अर्थ होतो. तसेच वर १६ व्या श्लोकांत 'सारंभपरित्यागी' असा जो शब्द आहे त्याचा अर्थहि "सर्व कम किंवा उद्योग सोद्धणारा" असा न करितां "ज्याचे समारंभ फलाशाविरहित स्याची कर्म ज्ञानाने दग्ध होतात" (गी. ४.१९) या श्लोकाशी समानार्थक अर्थात् "काम्य आरंभ मह. कम सोहणारा" असाच करावा लागतो, हे गी. १८.२ आणि १८.४५ व ४९ या श्लोकांवरून सिद्ध होते. सारांश, घसदारांत, बाय- कामुलांत किंवा जगाच्या इतर व्यवहारांत ज्याचे चित्त गुंतलेले असते त्याला त्यापासून पुढे दुःख होते, म्हणून या सर्व गोष्टीत चित्त गुंत- वून ठेवू नये, एवढेच गीतेचे सांगणे आहे. आणि मनाची हीच वैरा- ग्ययुक्त स्थिति दाखविण्यास गीतेत 'अनिकेत,' 'सर्वारंभपरित्यागी' इत्यादि शब्द स्थितप्रज्ञाच्या वर्णनांत येत असतात. हेच शब्द यतीची म्हणजे कर्मत्याग करणान्या संन्याश्यांची जी वर्णने आहेत त्यांतहि स्मृतिग्रंथांत आलेले आहेत. पण तेवल्यामुळे कर्मत्यागरूप संन्यासच गर्सित प्रतिपाद्य आहे असे म्हणता येत नाही. कारण ज्याच्या बुद्धीत हैं वैराग्य पूर्ण भिनले अशा ज्ञानी पुरुषानहि याच विरक्त बद्धीने फलाशा सोडून शास्त्रता प्राप्त होणारी सर्व कर्मे केलीच पाहिजेत, असा याबरोबरच गीतेचा दुसराहि निश्चित सिद्धान्त आहे; आणि हा पूर्वा- पर सर्व संबंध लक्षात न घेता 'अनिकेत' शब्दासारखे वैराग्यबोधक शब्द गीतेत काठ आढळले की तेवढयावर मदार ठेवून कर्मसंन्यासपर मार्गच गीतेत प्रतिपाद्य आहे, असे म्हणणे बरोबर नाही. - -- - - - - -