पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ श्रीमद्भगवद्गीता. अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९ ॥ ही ज्याला सारखींच, व ज्याला (कशांतहि) आसक्ति नाही, (१९) ज्याला निदा व स्तुति दोन्ही समसमान, जो मितभाषी, व जे काही मिळेल तेव- ज्यानेच संतुष्ट, आणि ज्याचे चित्त स्थिर असून जो अनिकेत म्हणजे ज्याचे कर्मफलाशारूप) बिहाड कोठेच राहिलेले नाही, असा भक्तिमान पुरुष मला प्रिय होतो. ['अनिकेत' हा शब्द गृहस्थाश्रम सोडून व संन्यास घेऊन रानांत भिक्षा मागत हिंडणाच्या यतींच्या वर्णनांतहि पुष्कळदा येत असतो (मनु.६.२५ पहा). व त्याचा धास्वर्थ 'घर नसणारा' असा आहे. म्हणून या अध्यायांतील 'निर्मम' 'सारंभपरित्यागी' व 'अनिकेत' आणि इतरम गीतेत 'त्यक्तसर्वपरिग्रहः' (७.२१, किंवा 'विविक्तसेवी' (१८.५३) इत्यादि जे शक आहेत त्यांवरून “घरदार सोडून निरि- छपणाने रानांत आयुष्याचे दिवस काढणे" असे जें संन्यासाश्रममा- र्गाचे परम ध्येय तेच गीतेत प्रतिपाद्य आहे, असे संन्यासमार्गीय रीकाकारांचे म्हणणे असून त्यास आधार म्हणून स्मृतिग्रंथांतील संन्या- साश्रमप्रकरणांतील श्लोक ते दाखवीत असतात. पण गीताव क्यांचे हे केवळ संन्यासपर अर्थ संन्याससंप्रदायदृष्टया जरी महत्वाचे असले तरी खरे नव्हेत. कारण, 'निरनि' किंवा 'निष्क्रिय होणे हा गीते. प्रमाणे खरा सन्यास होत नसून फक्त फलाशा सोडावी, कम कधीच सोडूं नयेत, असा गीतेचा कायम सिद्धान्त आहे, हे मागे अनेक वेळा सांगितले आहे (गी. ५.२ व ३.१,२ पहा). म्हणून 'अनिकेत' या पदाचा अर्थ घरदार सोडणे असा न घेतां गीतेतील कर्मयोगाला जुळेल असाच घेतला पाहिजे. गी. ४.२० या श्लोकांत कर्मफलाची आशा न ठेवणाच्या पुरुषासच निराश्रय हैं विशेषण दिलेले असून गी. ६.. यांत "अनाश्रितः कर्मफलं" असे त्याच अर्थी शब्द आलेले