पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १२, २५॥ SS अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च । म्हणणारांस ध्यानापेक्षा हाणजे भक्तीपेक्षा कर्मफलत्यागाचे श्रेष्ठत्व मान्य होत नाही. पातंजलयोग, ज्ञान किंवा भक्ति या तीन संप्रदायाहून भिन्न म्हणजे गीतेतील भक्तियुक्त कर्मयोगसंप्रदाय हल्ली बहुतेक लुप्त आहे; व त्यामुळे त्या संप्रदायाचा टीकाकारहि डरला नाही. म्हणून हल्ली गीतेवर ज्या उपलब्ध टीका आहेत त्यात कर्म- फलस्यागाचे श्रेष्ठत्व अर्थवादात्मक ठरविले आहे. पण आमच्या मते ही चूक होय. गीतेत निष्काम कर्मयोगच प्रतिपाद्य आहे असे मानिले म्हणजे या श्लोकाच्या अर्थाबद्दल काहीच अडचण रहात नाही. कर्म सोडून चालत नाही, निष्काम कर्म केलेच पाहिजे, असे म्हटलें म्हणजे स्वरूपतः कर्मत्याग करणारा ज्ञानमार्ग, किंवा नुस्ती इंद्रियांची कसरत करणारा पातंजलयोग, अगर सर्व कमैं सोडून देणारा भक्तिमार्ग, सर्वच कर्मयोगापेक्षा कमी योग्यतेचे ठरतात. निष्काम कर्मयोग याप्रमाणे श्रेष्ठ ठरल्यावर त्यांत अवश्य लागणारी भक्तियुक्त साम्यबुद्धि संपादन करण्यास उपाय काय एवढाच काय तो प्रश्न शिल्लक रहातो.हे उपाय तीन आहेत-अभ्यास, ज्ञान, व ध्यान. पैकी कोणाला अभ्यास करवत नसला ता त्याने ज्ञान किंवा ध्यान यांपैकी कोणताहि उपाय स्वीकारावा. हे उपाय आचरण्यास यथोक्तक्रमाने सुलभ आहेत असें गोता सांगत आहे. पण हेहि न साधले, तर मनुष्याने कर्मयोगाच्या आचरणासन एकदम सुरुवात करावी म्हणजे झाले असे १२ च्या श्लोकांत सांगितले आहे. आतां या ठिकाणी अशी एक शंका येत्ये की, ज्याला अभ्यास होत नाही वज्ञानध्यानाहि होत नाही, तो कर्मयोग तरी कसा चालविणार तेगां कर्मयोग सर्वापेक्षा सुलभ म्हणणेच निरर्थक होय असे कित्येकांनी ठरविले आहे. पण जरा विचार केला तर या आक्षेपांत काही अर्थ नाही असे दिसून येईल १२ व्या श्लोकांत सर्वकर्मफलत्याग 'एक- दिम'कर असे म्हटलेले नाही. तर भगवंतांनी वर्णिलल्या कर्मयोगाचा