पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति ॥ २५ ॥ तत्रापश्यस्थितान्पार्थः पितृनथ पितामहान् । आचार्यान्मातुलान्भ्रातून्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥ २६ ॥ श्वशुरान्सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि। प्रशस्त ज्याचे केस तो कृष्ण, व गुदा म्हणजे गूढ किंवा दाट ज्याचे केस तो अर्जुन, असे अर्थ होऊ शकतील. भारतावरील टीकाकार नीलकंड याने गुडाकेश शब्दाचा हा अर्थ गीता १०.२० वरलि आपल्या टीकेंत्त विकल्पाने सुचविलेला आहे, व रोमहर्षण असे जे सूनाच्या बापाचें नांव आहे त्यावरून हृषीकेश शब्दाची वर दिलेली दुसरी व्युत्पत्तीहि असं- भवनीय म्हणता येत नाही. किंबहुना महाभारतांत शांतिपर्वोतर्गत नारायणोपाख्यानांत विष्णूच्या मुख्य मुख्य नांवांची निशक्ति देतांना हृषी म्हणजे आनंददायक, आणि केश म्हणजे किरण असा अर्थ करून सूर्यचंद्ररूप आपल्या विभूतींच्या किरणांनी सर्व जगाला हर्षवितो म्हणून त्याला हृषीकेश म्हणतात असे सांगितले आहे. ( शां. ३४५. ४७ व १४२.६४,६५ पहा; उधो. ६९.९); व त्याचप्रमाणे केशव हा शब्दह केश म्हणजे किरण या शब्दापासुन निघाला असें पूर्वांच्या श्लो- कांतून म्हटले आहे (शां. ३४१.४७). यांपैकी कोणताहि अर्थ घेतला तरी श्रीकृष्णास व अर्जुनास ही नांवें पडण्याचे सर्वांशी योग्य कारण सांगता येत नाही. पण हा दोष नरुक्तिकांचा नव्हे. अत्यंत रूढ झालेल्या विशेषनामांची निरुक्ति सांगावयाची म्हटली म्हणजे अशा प्रका- रच्या अडचणी येणे किंवा मतभेद होणे अगदी साहजिक आहे.] (२५) भीष्मद्रोणाच्या व सर्व राजांच्या समोर " अर्जुना! (येथें) जमलेले हे कौरव पहा," असें (ते) म्हणाले. (२६) तेव्हा अर्जुनाच्या असे मजरेस आले की, तेथे जमलेले सर्व (आपलेच) वडील, आजे, आचार्य,