पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा अध्याय 11. २५७ श्रीभगवानुवाच । कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिहाप्रवृत्तः । ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ।। ३२ ।। तस्मात्त्वमुात्तष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् क्ष्व राज्यं समृद्धम् । मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ।। ३३ ॥ द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्ण तथान्यानपि योधवीरान् । मया हतांस्त्वं जहि मा व्यधिष्टा युद्धद्यस्व जेतासि रणे सपत्नान् ॥ ३४ ॥ श्रीभगवान् म्हणाले-(३२) मी लोकांचा क्षय करणारा व वृद्धिंगत झालेला 'काळ' आहे आणि येथे लोकांचा संहार करण्यास निघाला आहे. तूं नसलास तरी, म्हणजे तूं काही केले नाहीस तरीहि, सैन्यासैन्यांतून उभे असलेले हे सर्व योद्धे नाहीसे होणार ( मरणार ) आहेत; (३३) तस्मात् । ऊठ, यश मिळव, आणि शत्रूना जिंकून समृद्ध राज्याचा उपभोग घे. मी यांना पूर्वीच मारिलेले आहेत. ( म्हणून आतां) हे सव्यसाची (अर्जुना)! तूं निमिसाला मात्र (पुढे) हो ! (३४) द्रोण व भीष्म व जयद्रथ आणि कर्ण व तसेच दुसरेहि वीर योद्धे मी (पूर्वीच) मारिलेले आहेत; स्यांना तूं मार ! घाबरूं नकोस ! लढ ! लढाईत शत्रूला तूं जिंकणार आहेस. । [सारांश उद्योगपति श्रीकृष्ण शिष्टाईला गेले होते त्या वेळी दुर्योधन तडजोडीचे कोणतेच बोलणे ऐकेना असे पाहून भीष्मांनी "कालपकमिदं मन्ये सर्व क्षत्रं जनार्दन" (म. भा. उ. १२७.३२)- हे सर्व क्षत्रिय कालपक्क झालेले आहेत-असें में श्रीकृष्णास नुसत्या शब्दांनी सांगितले त्याचाच हा प्रत्यक्ष देखावा श्रीकृष्णांनी आपल्या विश्वरूपाने अर्जुनास दाखविला आहे. वर श्लोक २६-३१ पहा. दुष्ट