पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि । केचिद्विलग्ना दशनांतरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगः ॥ २७ ॥ यथा नदीनां बहाबुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति । तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥२८॥ यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः। तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः॥२९॥ लेलिहसे ग्रसमानः समंताल्लोकान्समग्रान्वदनैवलद्भिः । तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥३०॥ आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तुते देववर प्रसीद । विज्ञातुमिच्छामि भवन्तमायं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥३१॥ आमच्या माजूच्यादि मुख्य मुख्य योद्धयांसह, (२७) तुमच्या विक्राळ दाढांच्या या अनेक भयंकर तोडांत भराभर शिरत आहेत। व कांहीं दांतांमध्ये सांपडून डोक्याचा चुराडा झालेल नजरेस येत आहेत. (२८) नद्यांच्या पाण्याचे अनेक लोट समुद्राकडेच ज्याप्रमाणे धांव घेतात तसे मनुष्य लोकांतील हे वीर! तुमच्या अनेक प्रज्वलित म्खांन शिरत आहेत. (२९) पेटलेल्या अग्नीत मरण्यासाठी मोठ्या वेगाने पतंग जसे उड्या टाकतात, तद्वतूच तुमच्याहि अनेक जबड्यांत (हे) लोक भरण्यासाठी मोध्या वेगाने शिरत आहेत. (३०) है विष्णो ! आसमंतात सर्व लोकांना आपल्या जाज्वल्य मुखांनी ग्रासून टाकीत तुम्ही जिभा चाटीत भाहां! व तेजाने सर्व जग व्यापून तुमच्या उग्र प्रभा (चोहोकडे) तळपत आहेत. (३१) है उग्ररूप धारण करणारे तुम्ही कोण हैं मला सांगा. हे देवदेवश्रेष्टा ! तुम्हाला नमस्कार करितो! प्रसनहा ! तुम्ही आदिपुरुष कोण हे जाण- ण्याची मला इच्छा आहे. कारण तुमची ही करणी मला (काहीच) कळत नाही!