पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १. योत्स्यमानानवेक्षेऽहं यं एतेऽत्र समागताः। धार्तराष्ट्रस्य दुर्बु युद्धे प्रियचिकीर्पवः ॥ २३ ॥ संजय उवाच । एवमुक्तो हषीकेशो गुडाकेशेन भारत । सेनयोरुभयोर्मध्ये स्थापियित्वा रथोत्तमम् ॥ २४ ॥ तयार असलेल्या या लोकांचे मी अवलोकन करितों, व मला या रण- संग्रामात कोणाबरोबर लढावयाचे आहे, आणि (२३) दुर्बुद्धि दुर्योधनाचे कल्याण करण्याच्या इच्छेने जे हे येथे लढणारे जमले आहेत, ते मी पाहून घेतो. संजय म्हणाला-(२४) हे धृतराष्ट्रा! गुडाकेशाने म्हणजे आलसाला जिंकणाच्या अर्जुनाने याप्रमाणे सांगितल्यावर हृषीकेगा म्हणजे इंद्रियांचे स्वामी श्रीकृष्ण यांनी (अर्जुनाचा ) उत्तम स्थ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केला केला; व- हृषीकेश व कुडाकेश या शब्दांचे वर जे अर्थ दिले आहेत ते टीका. कारांस अनुसरून दिले आहेत. नारदपंचरात्रांतहि हृषीक म्हणजे इंद्रियें व त्यांचा ईश म्हणजे स्वामी अशी हृषीकेशाची निरुक्ति दिली आहे (ना. पंच. ५.६.१७) आणि अमरकोशावरील क्षीरस्वामीच्या टीकेंत हर्षीक म्हणजे इंद्रिये हा शब्द हृप-आनंद देणे या धातूपासून झाला असून इंद्रिये मनुष्याला आनंद देतात म्हणून हृषीक हे त्यांचे नांव आहे तथापि हृषीकेश व गुडाकेश यांचे वरील अर्थ बरोबर आहेत की नाहीत याबद्दल शंका येत्ये. कारण हृषीक म्हणजे इंद्रिये, आणि गुडाका म्हणजे निद्रा किंवा आळस, हे शब्द प्रचारात नसून हृषीकेश व गुडाकेश या शब्दांची दुसन्या रीतीनेहि व्युत्पत्ति लागण्या सारखी आहे. हृषीक+ ईश आणि गुढाका+ईश याऐवजी हृषीकेश व गुडा+केश असाहि पद- च्छेद करितां येईल; आणि मग हृषी म्हणजे हर्षाने उभारलेले किंव - -- -- - - - - - - - - - - - -- - - - - - - -