पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १. २३५ रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहरुपादम् । बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम् ॥ २३ ॥ नभःस्पृशं दीप्तमनेकवर्ण व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् । दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितांतरात्मा धृति न विंदामि शमं च विष्णो ॥ २४ ॥ दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसंनिभानि । दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ॥ २५ ॥ अमी च त्यां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसंधैः । भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुरुयैः ॥२६॥ निषदांत (३.९, २.) आठ वसु अकरा रुद्र, बा। आदित्य आणि 'इंद्र व प्रजापति मिळून ३३ देव होतात असें वर्णन असून, महाभारतांत आदिर्व अ. ६५ व ६६ व शान्तिपर्व अ. २०८ यांत त्यांची नांवें व उत्पत्ति सांगितली आहे.] (२३) हे महाबाहो ! तुमचे हे अवाढव्य, अनेक तौढांचे, अनेक डोळ्यांचे, अनेक बाहूंचे, अनेक मांड्यांचे, अनेक पायांचे, अनेक दरांचे व अनेक दाढरेमुळे विक्राळ दिसणारे रूप पाहून सर्व लोकांना व मलाहि भीति उत्पन्न झाली आहे. (२४) आकाशाला जाऊन भिडलेले, तेजस्वी, अनेक रंगाचे, जबडा पसरलेले, आणि मोठ्या व प्रदीप्त डोळपांनी युक्त अशा तुम्हांला पाहून अंतरारमा व्याकुळ झाल्याने हे विष्ण!! माझा धीर सुटला व शान्सिहि नाहीशी झाली! (२५) आणि दाढांनी विक्राळ व प्रळयकाळच्या अग्नीसारखी तुमची (ही) तोंडे पाहूनच, मला दिशा कळत माहीत, आणि समाधानहि वाटत नाही (असे झाले आहे). हे जग. सिवासा देवदेवा ! प्रसन्न व्हा! (१६) हे पहा, राजांच्या गणांसह धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, भीष्म, द्रोण आणि तसाच हा सूतपुत्र (कर्ण),