पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५१ श्रीमद्भगवद्गीता. द्यावापृथिव्योरिदमंतरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः । दृष्ट्वान्दुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥ २० ॥ अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति केचिगीताः प्रांजलयो गृणन्ति । स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसंघाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः ॥ २१ ॥ रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोमपाश्च । गंधर्वयक्षासुरसिद्धसंघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥ २२ ॥ किंवा अंत नसून ज्याला अनंत बाहु, चंद्र व सूर्य हे ज्याचे डोळे आणि पेटलेला अग्नि हैं ज्याचे तोंड, असे अनंतशक्तिमान तुझीच आपल्या तेजाने या सर्व जगाला तापवीत आहो असें मी पहातो. (२०) कारण आकाश व पृथ्वी यांच्यामधील हे (सर्व) अंतर आणि सर्व दिशा तुझी एकट्याने व्यापून टाकिल्या आहेत; व तुमचे हैं अभदत व उग्र रूप पाहन हे महात्मनू ! त्रैलोक्याची (भीतीने ) गाळण उडाली आहे. (२१) हे पहा, देवाचे हे गण तुमचे ठायीं प्रवेश करीत आहेत, (व)काही भयाने हात जोडून प्रार्थीत आहेत; (आणि) स्वस्ति, स्वस्ति' असे म्हणून पुष्कळ प्रकारच्या स्तोत्रांनी महर्षि व सिद्ध यांचे गण तमचे स्तवन करीत आहेत (२२) (तसेच) रुद्र व आदित्य, वसु आणि जे साध्यगण ते, विश्वेदेव, (दोन्ही) अश्विनी कुमार व मरुद्गण व उधमपा म्हणजे पिता, आणि गंधर्व, यक्ष, राक्षस व सिद्ध यांचे मेळे सर्वत्र विस्मित होऊन तुमच्याकडे पहात आहेत. । [श्राद्ध काली पितरांस अर्पण केलेल्या अन्नांचे ते उनऊन ( उष्ण) असेपर्यंतच पितर ग्रहण करितात, म्हणून त्यांस 'उष्मपा' असें नांव आहे (मनु. ३. २३७.) याच पितरांचे सेमपद, अग्निवास, बर्हिषद, सोमपा, हविष्मान् , आज्यपा आणि सुकालिन् , असे सात प्रकारचे गण मनुस्मृतींत (३. १९४-२००) सांगितले आहेत. आदित्यादि देवता वैदिक आहेत. वर श्लोक पहा. बृहदारण्यकोप-