पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ११. २२९ एकादशोऽध्यायः। अर्जुन उवाच । मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंक्षितम् । यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥१॥ भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया । स्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥२॥ एवमेतद्यथात्थ त्वमात्मानं परमश्वर। द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥ ३ ॥ मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो। योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् ॥ ४ ॥ अध्याय अकरावा. [भगवंतांनी गेल्या अध्यायांत आपल्या विभूतीचे वर्णन केल्यावर परमेश्वराचे विश्वरूप पहाण्याची अर्जुनास इच्छा होऊन त्याच्या प्रश्ना- वरून भगवंतांनी त्याला जे विश्वरूप दाखविले त्याचे वर्णन या अध्यायांत आहे हे वर्णन इतकें सरस आहे की, गीतेच्या उत्तम भागांत याची गणना होत असून इतर गीता रचणारांनी त्याचेच अनुकरण केलेले आहे, प्रथम अर्जुन असे विचारिती की-] अर्जुन म्हणाला-(1) माझ्यावर अनुग्रह म्हणून अध्यात्मसंज्ञक जी परम गुह्य गोष्ट तुम्ही सांगितली त्याने माझा मोह नाहीसा झाला. (२) तसंच हे कमलपनाक्षा! भूतांची उत्पत्ति व लय भाणि (तुमचे) अक्षय माहात्म्यहि तुमच्यापासून मी सविस्तर ऐकिलें. (३)(आतां)हे परमेश्वरा। तुम्ही आपले हे जसे वर्णन केले तशा प्रकारे तुमचे ईश्वरी स्वरूप है पुरुषोत्तमा ! मी (प्रत्यक्ष) पाहू इच्छितो. (४) हे प्रभो ! तशा प्रकारचे रूप मी पहाणे शक्य आहे असे जर तुम्हांस वाटत असेल, तर हे योगेश्वरा! तुम्ही आपले अव्यय स्वरूप मला दाखवा!