पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्सर व टीपा-अध्याय ... २२० घृतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् । जयोस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ।। ३६ ।। वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजयः। मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥३७॥ दंडो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् । मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् । ३८ ॥ यश्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन । न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥ ३९॥ नांतोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप । एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेविस्तरो मया ॥ ४० ॥ $$ यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावगच्छ स्वं मम तेजोऽशसंभवम् ॥ ४ ॥ (३६) फसविणाऱ्यांचे चूत मी आहे; तेजस्व्यांचे तेज मी; (विजय- शाली पुरुषांचा) विजय मी आहे; (निश्चयी पुरुषांचा) निश्चय मी आहे; सस्वशीलांचे सत्व मी. (३७) यादवापैकी वासुदेव मी आहे; पांडवांत धनंजय मुनींपैकीहि व्यास मी; कवींमध्ये शुक्राचार्य कवि; (३८) शासन करणान्यांचा दंड म आहे; जयेच्छंची नीति म्हणजे मसलत मी आहे; आणि. गुह्यांपैकी मौन देखील मी आहे. ज्ञान्यांचे ज्ञान मी. (३९) तसेच हे अजुना सर्व भूतांचे जे काही बीज ते मी; मला सोभून असेल असें चराचर भूत नाही. (४०) है परंतपा! माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. विभूतींचा हा विस्तार (केवळ) दिग्दर्शनार्थ मी सांगितला आहे. [याप्रमाणे प्रमुख प्रमुख विभूती सांगून आता या प्रकरणाचा उपसंहार करितात- (५१) जी जी वस्तु वैभव, लक्ष्मी, किंवा प्रभाव यांनी युक्त आहे