पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. मृत्युः सर्वहरवाहमुद्भवश्च भविष्यताम् । कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥३४॥ बृहत्साम तथा सानां गायत्री छंदसामहम् ।। मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५ ॥ चारी बाजूंनी मुखें असणारा धाता म्हणजे ब्रह्मदेव मी. (१४) आणि स- वाचा क्षय करणारा मृत्यु, व पुढे जन्मास येणान्यांचे उत्पत्तिस्थान मी; स्त्रियांपैकी कीर्ति, श्री आणि वाणी, स्मृति, मेधा, धृति व क्षमा मी. । [कीर्ति, श्री, वाणी इत्यादि शब्दांनी त्या त्या देवता विवक्षित आ- हेत. यांपकी वाणा आणि क्षमा या दोन सोडून बाकीच्या पांच व दुसया पांच (पुष्टी, श्रद्धा, क्रिया, लजा व मति) मिळून दहा दक्षाच्या कन्या असून स्या धर्मास दिल्या असल्यामुळे त्यांस धर्मपत्नी ह्मणनात असें महाभारतात (आदि. ६६,१३,१४) वर्णन आहे. ] (३५) तसेच साम म्हणजे गावयाच्या वैदिक स्तोत्रांत बृहस्साम, (व) छंदांपैकी गायत्री छंद मी; महिन्यांत मार्गशीर्ष मी; ऋतूंत वसंत. महिन्यांमध्ये मार्गशीर्षाला में प्रथम स्थान दिले आहे ते तत्काळी बारा महिन्याची गणना करितांना मार्गशीर्ष महिना पहिला धरून मोजण्याची वहिवाट होती म्हणून होय (म. भा. अनु. १०६ व १०९) आणि वाल्मीकिरामायण ३.१६ पहा), भागवत ११.१६.२७ यांतहि असाच उल्लेख आहे. मृगांर्ष नक्षत्रास अग्रहायणी किंवा वर्षारंभीचे नक्षत्र असें नांव असून, मृगादि नक्षत्रगणना जेव्हां प्रचारांत होती तेव्हा मृगनक्षत्राला प्रथम अग्रस्थान मिळाले, व त्यावरून मार्गशीर्ष महिन्यालाहि पुढे श्रेष्ठत्व आले असावं, इत्यादि विचार आम्हीं आ- मच्या 'ओरायन' ग्रंथांत केला आहे तो पहा.विस्तारभयास्तव तो येथे देत नाही.]