पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. काश्यश्च परमेष्वासः शिखंडी च महारथः । धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥ १७ ॥ दुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते । सौभद्रश्च महाबाहुः शंखान्दध्मुः पृथक् पृथक् ॥ १८ ॥ स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्। नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥ १९॥ $$ अथ व्यवस्थितान्दृष्ट्या धार्तराष्ट्रान्कपिध्वजः। प्रवृत्ते शला संपाते धनुरुद्यम्य पांडवः ॥ २० ॥ हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते । भर्जुन उवाच । सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ २१ ॥ याचदेतानिरीक्षेऽहं योद्धकामानवस्थितान् । कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ॥ २२ ॥ आणि मणिपुष्पक,(१७) तसेच महाधनुर्धर काशिराज, महारथी शिखंडी, आणि धुष्टद्युम्न, विराट व अजिंक्य सात्यकि, (१८) द्रुपद आणि द्रोपदीचे (पांच) मुलगे आणि महाबाहु सौभद्र (अभिमन्यु ), या सर्वांनी, हे राजा (धृतराष्ट्रा ) ! चोहोकडे आपआपले पृथक् शंख फुकिले, (१९) आकाश व पृथ्वी दणाणून सोडणाऱ्या त्या तुंबळ आवाजाने कौरवांचे काळोज फाडून टाकिले. (२०) नंतर कौरव व्यवस्थेने उभे आहेत हे पाहून, एकमेकांवर शस्त्रप्रहार होण्याची वेळ आली असतां धनुष्य उचलून, ध्वजावर मारुति असणारा पांडव म्हणजे अर्जुन, (२१) हे राजा धृतरामा ! श्रीकृष्णास असे शब्द बोलला की, अर्जुन म्हणाला-हे अच्युता! माझा रथ दोनही सैन्यांच्या मध्ये (जरा) नेऊन उभा कर, (२२) म्हणजे तितक्यांत युद्धाच्या इच्छेनें