पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ... २२५ प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् । मृगाणां च मृगेंद्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ ३० ॥ पवनः पवतामारम रामः शस्त्रभृतामहम् । झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवि ।। ३१ ॥ सर्गाणामादिरंतश्च मध्यं चैवाहमर्जुन । अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ ३२ ॥ अक्षराणामकारोऽस्मि इंद्वः सामासिकस्य च । अहमेवाक्षयः कालो धाताऽहं विश्वतोमुखः ।। ३३ ।। नाहीत. कारण, काही ठिकाणी नागांचीच प्रमुख कुले सांगतांना त्यां- पैकी अनंत व वासुकी ही पहिल्याने दिली आहेत; आणि दोन्हीही अनेक डोक्यांचे व सविष, पण अनंत अग्निवर्ण व वासुकी पीतवर्ण आहे असे वर्णन आहे. भागवतांतील पाठ गीतेप्रमाणेच आहेत.] (३०) आणि दैस्यांपैकी प्रल्हाद मी आहे; प्रासणान्यांत काल मी; आणि पशुंपैकी मृगेन्द्र म्हणजे सिंह मी; आणि पक्ष्यांत गरुड. (३१) वेग- वामांत वायु मी आहे; शस्त्रधान्यांत राम मी आणि माशांमध्ये नक मी आहे; नद्यांत भागिरथी मी आहे; (३२) हे अर्जुना ! सृष्टिमानाचा आदि व अंस व मध्यहि मी; विद्यांपैकी अध्यात्मविद्या; वाद करणारांचा बाद मी. मागे २० व्या श्लोकांत सचेतन भूतांचा आदि, मध्य ध अंत मी असे सांगितले, व आतां सर्व चराचर सृष्टीचा आदि, मध्य व अंत मी असे सांगतात, हा भेद आहे.] (३३) अक्षरांपैकी आकार मी आहे, आणि समासांपैकी (उभयपद- प्रधान) द्वंद्व; (निमेषमुहूर्तादि) अक्षय काल मीच; सर्वतोमुख म्हणजे गी. र.१४