पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ श्रीमद्भगवद्गीता. - - - - - - - - - - - - - - - - - - - - रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ! "ऋक्सामयजुरेवच" या वाक्यांत सामवेदापेक्षां ऋग्वेदाला अग्रस्थान दिले असून सामान्य समजूनहि तशीच आहे. ही परस्परविरोधी विधाने होऊन त्यावर कित्येकांनी बन्याच कल्पना लढविल्या आहेत. छांदोग्यो- पनिषदांत ॐकारालाच उद्गीथ' हे नांव असून " हा उद्रीय साम- वेदाचे सार होय व सामवेद हा ग्वेदाचें सार होय" असें वर्णन आहे (छां. १, १.२). छांदोग्यांतील या वाक्याने सर्व वेदांत श्रेष्ठ कोण याबद्दलच्या वरील निरनिराळ्या विधानांची एकवाक्यता होऊ शकरये, कारण सामवेद झाला तरी त्यांतील मंत्र मूक ऋग्वेदातूनच घेतलेले आहेत. पण तेवल्यावर संतुष्ट न होता सामवेदाला गीतेत या ठिकाणी जे प्राधान्य दिले आहे त्यात काही तरी गूढ कारण असले पाहिजे असे कित्येकांचे म्हणणे आहे. छांदोग्योपनिषदांत सामवेदाला जरी प्राधान्य म्हटले आहे तरी मनूने " सामवेदाचा ध्वनि अशुचि होय” (मनु. ४. १२४) असे दिले आहे. ह्मणून सामवेदाला प्राधान्य देणारी गीता मनुच्या पूर्वीची असावी असें एकानें अनुमान केले आहे; आणि दुसरा असे म्हणतो की, गीतेचा कर्ता सामवेदी असल्यामुळे त्याने सामवेदाला या ठिकाणी प्राधान्य दिले असावे. परंतु " वेदांपैकी सामवेद मी" याची उपपत्ति लाव- प्यास आमच्या मते इतके लांब जावयास नको. भक्तिमार्गात परमेश्व- राच्या गानपर स्तुतीस नेहमी प्राधान्य दिलेले असते. उदाहरणार्थ, नारायणीय धर्मात " वेदेषु सपुराणेषु सांगोपांगेषु गीयसे" (म. भा. शां. : ३४.२३) असें नारदाने भगवानाचे वर्णन केले असून वसुराजा "जय जग"- जप्य गात होता (शा. ३३७.२७%आणि १५२. ७. ध पहा)--असा गै' धातूचाच प्रयोग पुनः केलेला आहे. म्हणून भक्तिपर धर्मातून यज्ञयागादि क्रियात्मक वेदांपेक्षा गानपर महणजे सामवेदाला अधिक महत्व दिले असल्यास त्यांत कांही आश्चर्य