पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ... २३१ अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः । अहमादिश्च मध्यं च भूतानामंत एव च ॥ २० ॥ आदित्यानामहं विष्णुज्योतिषां रविरंशुमान् । मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥२१॥ वेदानां सामवेदोऽस्मि देवानामास्मि वासवः। इंद्रियाणां मनश्वास्मि भूतानामस्मि चेतना ॥ २२ ॥ [या विभूतिवर्णनाप्रमाणेच अनुशासनपर्वात (१४.३११-३१) व अनुगीतेत (अध. ४३ ज ४४) परमेश्वराच्या रूपाचे वर्णन आहे. पण गीतसले वर्णन त्यापेक्षा अधिक सरस असल्यामुळे त्याचाच दुसन्या ठिकाणीं अनुवाद केलेला आढळून येतो. उदाहरणार्थ, भागवतपुराणाच्या एकादशकंधांतील सोळाव्या अध्यायांत याच प्रकारचे विभूत्तिवर्णन भग. वंतांनी उद्भबास निरूपिले असून ते या अध्यायांतील वर्णमाप्रमाणे आहे असें तेथेंच (भाग. ११. १६. ६-८) आरंभी म्हटले आहे.] (२०) सर्व भूतांच्या अंतरी असणारा आस्मा, हे गुडाकेशा! मी; आणि (सर्व) भृतांचा आदि, मध्य व अंतहि मी. (२१) (बारा) आदित्यां- पैकी विष्णु मी, तेजस्यांमध्ये किरणमाली सूर्य; (सात किंवा एकुणपन्नास) मरुतांत मरीचि मी आहे; नक्षत्रांत चंद्र मी. (२२) मी वेदांपैकी सामवेद आहे; देवांपकी इद्र आहे; आणि इंद्रियांमध्ये मन आहे; भूतांच्या ठायीं चेतना म्हणजे प्राणाची हालचाल भी आहे. । (वेदांपैकी सामवेद मी, म्हणजे सामवेद मुख्य, असे या ठिकाणी जें वर्णन आहे, तद्वतच महाभारतांत अनुशासनपर्वातहि (१४. ३१७) सामवेदश्च वेदानां यजषां शतरुद्रीयम्" असे म्हटले आहे. पण अन. गीतेत 'ॐकारः सर्ववेदानां' (अश्व. ५४ ६) असे ॐकारासच सर्व वेदांत श्रेष्ठत्व दिले असून गीतेतहि पूर्वी (गी, ७. ८) "प्रणवः सर्ववेदेषु" असें सांगितले आहे. तसेच गीता ९.१७ यांत