पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ... १० इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्धिताः ॥ ८ ॥ यांपैकी तीन किंवा दोन प्रधान मामितात. पण या कल्पना भगवद्रीतेस मान्य नसून गीता एकव्यपंथाची, म्हणजे एकाच परमे. श्वरापासून चतुम्यूहादि सर्व काही झाले असे प्रतिपादन करणारी आहे, असे आम्ही गीतारहस्शंत दाखविले आहे (गीतार. पृ. १९२ व ५३५ पहा ) म्हणून प्यूहात्मक वासुदेवादि मूर्ति स्वतंत्र न मानितां, हे चारी व्यूह एकाच परमेश्वराचे म्ह. सर्वव्यापी वासुदेवाचे (गी. ७. १९) 'भाव' आहेत असे या श्लोकांत विधान केले आहे. अशा दृष्टीने पाहिले म्हणजे पूर्वीचे चार' हे शब्द भागवतधर्माप्रमाणे सप्तऋर्षीच्या पूर्वी उत्पन्न झालेल्या वासुदेवादि चतुष्युहास अनुलशुन आहेत असे दिसून येईल. मागवतधर्माचे चतुयूहादि भेद पूर्वापासून प्रचारांत होते, असे भारतांतच सांगितले आहे म. भा. शां. ३४८.५७); आम्हीही कल्पना नवीन काढलेली नाही. सारांश, 'सात महर्षि म्ह० मरीच्यादि, पूर्वीचे चार ' म्ह. वासुदेवादि चतुयूह आणि 'मनु' म्ह० तत्काल. पूर्वी झालेले आणि तत्काली वर्तमान मिळून स्वायंभुवादि सात मनु, असा भारतांतील नारायणीयाख्यानानुसार आम्ही या श्लोकाचा अर्थ लावितो. अनिरुद्ध म्हणजे अहंकार आदिकरून चारी मूर्ति परमेश्वराचे पुत्र मानण्याची कल्पना भारतांत दुसरे ठिकाणीहि आलेली आहे (म. भा. शां३११.७,८ पहा). परमेश्वराचे भाव सांगितले; आता हे जाणून उपासना केल्याने काय फल मिळते ते सांगतात--] (७) माझी ही विभूति म्हणजे विस्तार, आणि योग म्हणजे हा विस्तार करण्याची युक्ति अगर सामर्थ्य, यांतील तश्व जो जाणितो, स्याला स्थिर (कर्म-) योग प्राप्त होतो यांत संशय नाही. (6) मी सर्वांचे उत्पत्ति- स्थान, व माझ्यापासून सर्व वस्तूंची प्रवृत्ति, हे जाणून शहाणे पुरुष भाव-