पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्व प्रवर्तते । त्यांच्या मते समक, सनंद, सनातन आणि सरकुमार (भागवत. ३.१२, ४) हेच ते चार ऋषि होत. पण या अर्थावर असा आक्षेप येतो की, हे चारी ऋषि यद्यपि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत तरी ते सर्व जन्मत:च संन्यासी असून प्रजा वृद्धि करीनात म्हणून ब्रह्मदेव त्यांच्यावर रागावला होता (भाग ३. १२; विष्णु. १.७) अर्थात् “ ज्यांपासून या लोकांमध्ये ही प्रजा झाली" येषां लोक इमाः प्रजा:- हे वाक्य या चार ऋषींस बिलकूल लागू पडत नाही. शिवाय हे ऋषि चार होते असें पुराणांतून जरी वर्णन आहे तरी भारतांत नारायणी न्हा भागवत धर्मात या चौघांत सनक, कपिल व सनत्सुजात या तिघांची भर घालून, हे सातहि ऋषि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र | असून पहिल्यापासूनच निवृत्तिधर्मातले होते असे वर्णन भाहे (म. भा ३४०.६७.६८) सनकादि ऋषि याप्रमाणे सात धरिले म्हणजे त्यांपैकी चारच येथे घेण्याचे काही कारण दिसत नाही. मग 'पूर्वीचे चार' कोण? आमच्या मते या प्रश्नाचे उत्तर नारायणीय किंवा भागवत धर्माच्या पुराणकथांवरूनच दिले पाहिजे. कारण, भाग क्तधर्मच गीतेत प्रतिपाद्य आहे हे आमच्या मते निर्विवाद आहे. आत्तां भागवतधर्मात सृष्टयुत्पत्तीची कोणत्या प्रकारची कल्पना होती हे पाहूं गेल्यास असे आढळून येईल की, मरीच्यादि सात ऋर्षांच्या पूर्वी वासुदेव (आत्मा), संकर्षण (जीव), प्रद्युम्न (मन), आणि अनि- रुद्ध (अहंकार) या चार मूर्ति उत्पन्न झालेल्या होत्या. व त्यापैकी शेवटच्या अनिरुद्धापासून म्हणजे ब्रह्मदेवापासून पुढे मरी च्यादि पुत्र निर्माण झाले असे म्हटले आहे (म. भा. शां. ३३१.३४-४० १६.- ७२११४०.२७-३१) बासुदेव,-संकर्षण, प्रद्युम्न व अनिद्या चार मूर्तीसच ' चतुयूह' ही संज्ञा असून, या चार मूर्ति स्वतंत्र होत्या असें भागवतधर्मातील एका पंथाचे मत आहे; भाणि दुसरे काही