पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १. $ तस्य संजनयन्हर्ष कुरुवृद्धः पितामहः । सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान् ॥ १२ ॥ ततः शंखाश्च भेर्यश्र पणवानकगोमुखाः। सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥ १३ ॥ ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यंदने स्थिती । माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः ॥ १४ ॥ पांचजन्यं हपीके शो देवदत्तं धनंजयः ॥ पौषं दध्मौ महाशंख भीमकर्मा वृकोदरः ॥ १५ ॥ अनंतविजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः। नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥ १६ ॥ म्हणून कोल्ह्यासारख्या शिखंडीकडून सिंहाचा घात होऊ देऊ नका." शिखंडीखेरीज दुसऱ्या कोणाचाही समाचार देण्यास भीष्म एकटेच समर्थ असून दुसन्याच्या सहाय्याची त्यांस अपेक्षा नव्हती.] (१२) (इतक्यांत ) दुर्योधनाला हर्षवित होत्साते प्रतापशाली वृद्ध कौरव पितामह (सेनापति भीष्म) यांनी सिंहसारखी मोठी गर्जना करून (लढाईची सलामी म्हणून) आपला शंख फुकिला, (१३) त्या बरोबर अनेक शंख, मेरी (नौबती), पणव, आनक आणि गोमुख ही (रणवाधे) झडण्यास एकदम सुरुवात झाली व तो नाद तुंबळ म्हणजे चोहोकड़े गर्द भरून गेला. (१४) नंतर पांढरे शुभ्र धोडे जोडिलेल्या मोठ्या रथांत बसलेले माधव (श्रीकृष्ण) आणि पांडव (अर्जुन) यांनी (आमच्या पक्षाचीही तयारी म्हणून प्रत्युत्तरादाखल) दिव्य शंख फकिले. (१५) हृषीकेश म्हणजे श्रीकृष्ण यांनी पांचजन्य (नांवाचा शंख), अर्जुनाने देवरस, भयंकर कमें करणाच्या वृकोदराने म्हणजे भीमसेनाने पौड नांवाचा मोठा शंख फुकिला (१६) कुंतीपुत्र युधिष्ठिरराजाने अनंतविजय, नकुल आणि सहदेव यांनी सुघोष