पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -- एतां विभूति योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ॥ चाक्षुष मन्वंतरांतील सप्तर्षि येथे विवक्षित आहेत असा अर्थ कित्येकांनी केला आहे. हे सप्तर्षि भृग्वादि म्ह. भृगु, नभ, विवस्वान्, सुधामा, घिरजा, अतिनामा व सहिष्णु हे सात होत. परंतु आमच्या मते हा अर्थ बरोबर नाही. कारण हल्लींच्या, म्हणजे वैवस्वत अथवा ज्या मन्वंतरांत गीता सांगितली त्याच्या पूर्वांच्या मन्वंतरांतले सप्तर्षि सांगण्याचे येथे काही कारण नाही. म्हणून हल्लीच्या, मन्वंतरीतलेच सप्तर्षि घेतले पाहिजेत, यांची नांवे मरीचि, अंगिरस, अत्रि, पुलस्त्य, पुलह, ऋतु आणि वसिष्ट अशीं महाभारताच्या शान्तिपर्वात नारायणी. योख्यानांत दिलेली आहेत) म. भा. शां. ३३५.२८,२९,३४०.६४ ब ६५); व तीच या ठिकाणी विवक्षित आहेत असे आमचे मत आहे. कारण नारायणीय किंवा भागवत धर्मच त्याच्या विधींसह गीत प्रतिपाथ केला आहे (गातार. पृ. १ पहा). तथापि येथे एवढे सांगणं जरूर आहे की, मरीच्यादि सतपाँची वरील नांवें अगिरसाच्या ऐवजी भृगूपासून कधीकधी दिलेली आढळतात; आणि काही ठिकाणी तर कश्यप, अग्नि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि व वसिष्ठ हे हलींच्या युगांतील सप्तर्षि होत असे वर्णन आहे (विष्णु. ३.१.३२ व । ३५ मत्स्य. ९२७ व २८; म. भा. अनु. ९३.२१). मर्राच्यादि वर दिलेल्या सात ऋषर्षांतच भृगु व दक्ष यांची भर घालून विष्णुपुराणांत नऊ (विष्णु १.५.५.६), आणि त्यांतच पुनः नारदाची भर घालून मनुस्मृतींत ब्रह्मदेवाचे दहा मानसपुत्र वर्णिल आहेत. (मनु. १.३४, ३५) व मरीच्यादि शब्दांची व्युत्पति भारतांत दिली आहे (म. मा, अनु. ८५). परंतु सात महर्षि कोणते एवढेचं सध्या आपल्याला पहाणे असल्यामुळे या नऊही. मानस पुत्रांचा किंवा त्यांच्या नाम- व्युत्पत्तीचा येथें विचार करण्याची अरूर नाही. पूर्वीचे' पूर्वमन्वं. तराचे सात महर्षि असा अर्थ लाषिता येत नाही उघड आहे.