पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर घटीपा-अध्याय १०. २११ महर्षयः सप्त पूर्वं चत्वारो मनवस्तथा। मद्भाषा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ ६॥ जन्म प्राप्त होण्यास लिंगशरीरांत असलेल्या बुद्धीच्या निरनिराळ्या अवस्था किंवा भाव हेच कारण होय असे त्यांचे म्हणणे आहे (गीता- र. प्र. १८८; व सां. का. ४०-५५ पहा); व तंच भाव बहुतेक वरील दोन श्लोकात वर्णिले आहेत. परंतु प्रकृति व पुरुष पांच्याहि पलीकडे परमात्मरूपी एक नित्य तत्त्व असून नासदीय सूक्तांत वर्णिल्याप्रमाणे स्याच्याच मनांत सृष्टि निर्माण करण्याची इच्छा उस्पा होऊन पुढे सर्व रश्य जगत् सत्य होते असा चेदान्त्यांचा सिद्धान्त असल्यामुळे सष्टीतील मायारमक सर्व पदार्थ हे परब्रह्माचे मानस भाव आहेत असें वेदान्तशास्त्रातहि म्हणत असतात (पुढील श्लोक पहा). तप, दान, यज्ञ इत्यादि शब्दांनी तनिष्ठक बुद्धीचे भाषच समजावयाचे. असो; भगवान् आणखी सांगतात की- (६) सात महर्षि, पूर्वीसे चार, तसेच मनु, ज्यांच्यापासून (या) लोका- मध्य ही प्रजा झाली, ते माझेच मानस म्हणजे मनामें निर्माण केलेले भाव होत. या श्लोकांतील शब्द सोपे असले तरी ज्या पौराणिक पुरुषांस उद्देशून हा श्लोक आहे त्यांच्यासंबंधाने टीकाकारांमध्ये पुष्कळच मतभेद आहे. विशेषतः पूर्वीचे' (पूर्व) आणि 'चार' (चत्वारः) या पदांचा अन्वय कोणत्या पदांशी लावावयाचा याचा निर्णय अनेकांनी अनेक प्रकारे केला आहे. सात महर्षि प्रसिद्ध आहेत; पण ब्रह्मदेवाच्या एका कल्पांत चवदा मन्वंतरें (गीतार. पृ. १२० पहा) असून त्या प्रत्येक मन्वंतराचा मनु, देव व सप्तर्षि निरनिराळे असतात (हरिवंश 1. विष्णु. व मत्स्य. १ पहा). महणून 'पूर्वीचे ' सात महर्षीचे विशेषण कल्पून हलच्या म्ह० वैवस्वत मन्वंतराच्या पूर्वीच्या