पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. अहमादिहि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥२॥ यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम्। असंमूढः स मर्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३ ॥ 8 बुद्धि नमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः । सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ ४॥ अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः। भवान्त भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥५॥ ती ऐक. (२) माझी उत्पत्ति देवांच्या गणांना आणि महर्षीनाहि कळत नाहीं कारण देवांच आणि महर्षीचे सर्व प्रकारे मीच आदिकारण (आई), (३) मी (पृथिव्यादि सर्व) लोकांचा मोठा ईश्वर असून मला जन्म व आदि नाहीं असें जो जाणितो, तोच मनुष्यांमध्ये मोहविरहित होऊन सर्व पापां- पासून मुक्त होतो. । [देवांच्याहि पूर्वी भगवान् विवा परब्रह्म आहे, देव मागून झालं, हा विचार ऋग्वेदाच्या नासदीय सूक्तांत आलेला आहे (गीसार. प्र. ९ पृ. २५२ पहा). असो; याप्रमाणे प्रस्तावना झाली. आता मी हवाचा महेश्वर कसा याचे भगवान् निरूपण करितात- (४) बुद्धि, ज्ञान, असंमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दुःख, भव (उद्भव), अभाव (नाश), तसेच भय आणि अभय, (५) अहिंसा, समता, तुष्टि (संतोष), तप, दान, यश, अयश इत्यादि अनेक प्रकारचे प्राणिमात्रांच भाव माझ्याचपासून उत्पन्न होतात. ['भाव' या शब्दाचा अर्थ 'अवस्था', 'स्थिति' किंवा 'वृत्ति' असा असन, सांस्यशास्त्रांत 'बुद्धचे भाव' व 'शारीरिक भाव' असा त्यांचा भेद केला आहे. सांख्यशास्त्री पुरुष अकर्ता व बुद्धि हा प्रकृप्तीचा एक विकार मानीत असल्यामुळ, लिंगशरीरास पशुपक्ष्यादिकांचे निरनिराळे