पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. S$ मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ॥ ३४॥ इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन- संवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥ ९॥ दशमोऽध्यायः । श्रीभगवानुवाच । भूय एव महाबाहो शणु मे परमं वचः। कोणताच भेद न ठेवितां सर्वांस एकच सद्गति देणारा भगवद्धतीचा जोहा राजमार्ग स्याची खरी महती महाराष्ट्रातील संतमंडळीच्या इति. हासावरून कोणासहि कळून येईल. वरील श्लोकाचा जास्त खुलासा गीतारहस्य प्र. १३ पृ. ४३६-४३८ मध्ये केला आहे तो पहा. जशा प्रकारचा हा धर्म आचरण करण्याबद्दल अर्जुनास ३३ व्या श्लोकाच्या उत्तरार्धात जो उपदेश आहे तोच पुढील श्लोकांत चालू आहे.] (३४) माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझे यजनपूजन कर, आणि मला नमस्कार कर. याप्रमाणे मरपरायण होऊन आपला योग बालविलास म्हणजे मलाच येऊन पाँचशील. 1 [वास्तवीक म्हटलें म्हणजे ३३ व्या श्लोकांतच या उपदेशास सुरुवात झाली आहे. प्रकृतीचा पसारा किंवा नामरूपात्मक मुष्टि अनित्य आणि परमात्माच काय तो नित्य, असा जो अध्यात्मशासाचा सिद्धान्त त्याला अनुसरून 'अनिस्य' हे पद ३३ व्या श्लोकांत आलेलें आहे, व 'अमुख' या पदाने या संसारात सुखापेक्षा दुःख अधिक आहे या सिदान्ताचा अनुवाद आहे. तथापि वर्णन अध्यात्मांतलें म.