पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ९. २०५ पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति। तदहं भक्त्युपहृतमन्नामि प्रयतात्मनः ॥ २६॥ तांनी म्हटले आहे त्यांतील तात्पर्य हेच होय, महाभारतांतहि- यस्मिन् यस्मिश्च विषयो यो ये याति विनिश्चयम् स तमेवाभिजानाति नान्यं भरतसत्तम । "जो पुरुष ज्या ज्या भावाच्या ठिकाणी निश्रित होतो तो त्या भावा- नुरूपच फल पावतो"-अ म्हटले असून (शा.३५२.३)" यं यथा यथोपासते तदेव भवति" अशी श्रति आहे (गी. ८. ६. वरील टीप पहा.) नानात्वाने म्हणजे अनेक देवतांची उपासना करणान्यास काय फल मिळते हे पहिल्या चरणांत सांगितल्यावर दुसन्या चरणांत भगवंताची अनन्यभावाने भक्ति करणारांसच खरी भगवत्प्राप्ति होते. हा अर्थ वर्णिला आहे. आतां भगवान् आपला भक्त आपल्याला काय समर्पण करितो इकडे न पाहता केवळ त्याच्या भावाकडेच दृष्टि देऊन स्याच्या भक्तिचा स्वीकार करीत असतात हे भक्तिमार्गातील महत्वाचे तत्व सांगतात-] (२६) एखादे पान, फूल, फळ किंवा (यथाशक्ति) थोडे पाणीहि जो मला भक्तीने अर्पण करितो, त्या प्रयतात्म म्हणजे नियतचित्त पुरुषाची ती भक्तीची भेट मी (आनंदाने) सेवन करितो.

[कर्मापेक्षा बुद्धि श्रेष्ठ (गी. २.४९) असे में कर्मयोगांतील तत्त्व

स्याचेच भक्तिमार्गातील रान्तर वरील श्लोकांत वर्णिले आहे. (गीतार. म. १५ पृ. ४७.-४७३ पहा). यासंबंधान सुदाम्याच्या पोह्यांची गोष्ट प्रसिद्ध असून भागवतपुराणांत हा श्लोक सुदामचरितोपाख्यानांतच आलेला आहे (भाग. १० . ८१. ४). पूजाद्रव्ये किंवा साहित्य पुष्कळ किंवा कमि असणे ही गोष्ट सर्वथैव व सर्वदा मनुष्याचे ताब्यां- - --