पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १. २०३ $$ येऽप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः। तेऽपि मामेव कौंतेय यजन्त्यविधिपूर्वकम् ।। २३ ॥ अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च । न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातयवन्ति ते ॥२४॥ (२३) श्रद्धेने युक्त होरसाते दुसन्या देवतांचे भक्त बनून जे यजन करितात तेहि हे कौंतेया ! विधिपूर्वक नसले तरी (पर्यायाने) माझंच यजन करितात; (२४) कारण सर्व यज्ञांचा भोक्ता व स्वामी मीच आहे. पण त्यांना माझे तश्वत: ज्ञान नाही म्हणून ते घसरत असतात. या दोन श्लोकांतील सिद्धान्तांचे महत्व काय यांचे विवेचन गीता- । रहस्याच्या तेराव्या प्रकरणांत (पृ.४१८-४२१) केले आहे ते पहा. कोण. तीहि देवता घ्या, ती भगवंताचे एक प्रकारचे स्वरूप आहे, हे तत्व वैदिक धर्मात फार प्राचीन काळापासून चालत आले आहे. उदाहरणार्थ, ऋग्वेदां. तच ' एक सद्विमा बहुधा वदंत्यग्निं यमं मातरिश्वानमाहुः" (ऋ.१.१६४ ४६)-परमेश्वर एक असून त्याला पंडित लोक अग्नि, यम, मातरिश्वा (वायु) अशी अनेक प्रकारची नांवे देत असतात, असें झटले आहे; आणि त्याला अनुसरूनच पुढील अध्यायांत परमेश्वर एक अससोहि त्याच्या अनेक विभूतींचे वर्णन केले आहे. त्याचप्रमाणे महाभारतान्तर्गत नारयणीयोपाख्यानांत चतुर्विध भक्तांत कर्म करणारा एकान्तिक भक्त श्रेष्ठ (गी. ७. १९ वरील टीप पहा ), असें सांगितल्यावर- __ब्रह्माणं क्षितिकंठं च याश्चान्या देवताः स्मृताः । प्रबुद्धचर्याः सेवन्तो मामे वैष्यन्ति यस्परम् ।। " ब्रह्मदेव, शिव किंवा दुसन्या देवाचं भजन करणारे साधु पुरुषहि मलाच येऊन पोचतात" (म. भा. शां. ३४६.३५),---असे म्हटले असून, गीतेतील वरील श्लोकांचा अनुवाद भागवतपुराणांतहि केलेला