पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ श्रीमद्भगवद्गीता. अनन्याश्चितयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ २२ ॥ नसून नित्य आहे. म्हणजे एकदां परमेश्वराप्रत पोचल्यावर पुनः जन्ममरणाचा फेरा रहात नाही. महाभारतांत (वन. २६०) स्वर्ग- सुखाचे जें वर्णन आहे तेहि असेंच आहे. परंतु यज्ञयागादिकानेच पर्ज- न्यादिकांची उत्पत्ति होत असल्यामुळे यज्ञयाग सोडिल्याने या जगां. तील योगक्षेम म्हणजे निर्वाह कसा चालेल अशी शंका येत्ये (गी. २.४५ वरील टीप व गीतार.पू. २९० पहा). म्हणून वरील श्लोकांना जोड़नच आता त्याचे उत्तर सांगतात-] (२२) जे अनन्यनिष्ट लोक माझें चिंतन करून मला भजतात त्या नित्य योगयुक्त पुरुषांचा योगक्षम मी चालवीत असता. न मिळालेली वस्तु मिळणे याचें नांव योग, व मिळविलेल्या वस्तूचे संरक्षण करणे म्हणजे क्षम, अशी योगक्षम याची व्याख्या शाश्व- तकोशांतहि (१०० व २९२ श्लोक पहा) केलेली असून, त्याचा एकंदर अर्थ संसारांतील नित्य निर्वाह' अला आहे. कर्मयोगमार्गात या श्लोकाचा अर्थ काय होतो याचा विचार गीतारहस्याच्या बाराव्या प्रकरणांत (पृ. ३८२, ३८३), केला आहे तो पहा. नारायणीय धर्मातहि याचप्रमाणे- मनीषिणो हि ये केचित् यतयो मोक्षधर्मिणः । तेषां विच्छिन्नतृष्णानां योगक्षेमवहो हरिः॥ असे म्हटले असून (म. भा. शा ३४८.७२), हे पुरुष एकान्तभक्त असले तरी प्रवृत्तिमार्गातले म्हणजे निष्काम बुद्धीने कम करणारे अस- तात असे तेथे वर्णन आहे. असो, आतां परमेश्वराची बहत्वाने जे सेवा करितात त्यांची अखेर वाट काय होत्ये ते सांगतात-] -