पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. - - - - - - - - - - - - - - - - $ विद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते । आंखडितो आणि सोडितों; अमृत व मृत्यु, ( तसेंच) सत् आणि असत्हि हे अर्जुना ! मी आहे. [परमेश्वराच्या स्वरूपाचे याचसारखे वर्णन पुनः सविस्तर १०,११ व १२ या अध्यायांत आले आहे. तथापि येथे केवळ विभूति न सांगतां परमेश्वराचा व जगांतील भूतांचा संबंध आईबाप, मित्र इत्यादिकांसा- रखा आहे, असें विशेष विधान केले आहे, हा दोहोकडल्या वर्णनांत थोढा भेद आहे. असो; पाऊस पाडणे व आंखडणे यांपैकी एक क्रिया जरी आमच्या दृष्टीने फायद्याची व दुसरी नुकसानीची असली तरी ताविकदृष्टया दोन्ही परमेश्वरच करीत असतो हे लक्षात ठेविले पाहिजे. हाच अभिप्राय मनांत आणून पूर्वी (गी. ७. १२) सात्विक राजस व तामस मिळून सर्व पदार्थ मीच उत्पन्न करितों असें भगवंतांनी म्हटले आहे; व पुढे १४ व्या अध्यायांत गुणत्रयविभागाने सृष्टीत नानारव कसे उत्पन्न होते याचे सविस्तर वर्णन केले आहे. अशा दृष्टीने पाहिले म्हणजे २५ व्या श्लोकांतील सत् आणि असत् या दोन पदाचा अनुक्रमें 'चांगले' व 'वाईट' असा अर्थ करितां येईल व पुढे (गी. १७. २६-२८) एकदां तसा अर्थ गीतेत केलेलाहि आहे. परंतु सत् म्हणजे अविनाशी आणि असत् म्हणजे विनाशी किंवा नाशवंत असे जे सामान्य अर्थ आहेत (गी.२.१६) तेच या ठिकाणीहि अभिप्रेत असावे, व मृत्यु छ अमृत' याप्रमाणे सत्व असत् 'हे द्वंद्वात्मक शब्द ऋग्वेदातील मासदीय सूकावरून सुचलेले असावे असे दिसते. तथापि नासदीय सूक्तांत 'सस्' हा शब्द श्य सृष्टीस लाविला आहे, गीता 'सत्' शब्द परब्रह्मास लावित्ये व दृश्य सृष्टीस असत् म्हणाये असा भेद आहे (गीतार.प्र. ९पृ. २५१-२४३ पहा). पण परिभाषेचा जरी याप्रमाणे मंद असला तरी