पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ९. १९३ नवमोऽध्यायः। श्रीभगवानुवाच । इदं तु ते गृह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥१॥ अध्याय नववा. कर्मयोगाचे आचरण करणाच्या पुरुषास परमेश्वराचे पूर्ण ज्ञान होऊन मनाची शांति किंवा मुक्तावस्था कशी प्राप्त होते हे दाखविण्या- साठी ज्ञानविज्ञानाच्या निरूपणाला सातव्या अध्यायांत सुरुवात करून अक्षर आणि अव्यक्त पुरुषाचे स्वरूप सांगितले, आणि अंतकालीहि ते स्वरूप मनांत कायम रहावे म्हणून पातंजल योगाने समाधि लासून ॐ कारोपासना शेवटी कशी करावी याचेहि गेल्या अध्यायांत वर्णन केले. परंतु अक्षर ब्रह्माचे ज्ञान होणेच आधीं कठिण, आणि त्यांतहि समाधि पाहिजे असे म्हटले म्हणजे सामान्य लोकांस हा मार्ग सोदून छावा लाग- णार !ही अडचण लक्षात आणून सर्व लोकांस जेणेकरून परमेश्वराचे ज्ञान सुलभ होईल असा राजमार्गभगवान् आता सांगतात यासच भक्तिमार्ग असे म्हणतात, व त्याचे सविस्तर विवेचन गीतारहस्याच्या तेराव्या प्रकरणांत आम्ही केले आहे. या मार्गात परमेश्वराचे स्वरूप प्रेमगम्य व व्यक्त म्हणजे प्रत्यक्ष कलशारे असते; आणि त्या व्यक्त स्वरूपाचेंच नऊ, दहा, अकरा व वारा या चार अध्यायांत विस्तृत निरूपण केले आहे. तथापि हा महिमामहि स्वतंत्र नसून सातव्या अध्यायांत कर्मयोगसिद्धयर्थ आरंभिलेल्या ज्ञानविज्ञानाचाच एक भाग आहे हे विसरता कामा नये; आणि या अध्यायाचा आरंभ मागील ज्ञानविज्ञानाचे अंग या दृष्टीनेच केला आहे.] श्रीभगवान् म्हणाले-(१) आतां तूं दोषदर्शी नाहींस झणन' गुह्मांतले गृह्य असें विज्ञानसहित ज्ञान, जे जाया पापापासून मुक्त गी. र. १२