पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ श्रीमद्भगवद्गीता. अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥२८॥ इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्ने श्रीकृष्णार्जुन- संवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥ से सर्व (कर्म-) योगी मागे टाकितो आणि त्याच्या पलीकडच्या आद्य- स्थानाला जाऊन पोचतो. 1 [ज्या मनुष्याने देवयान आणि पितृयाण या दोन मागांतील तत्त्व ओळखिले हाणजे देवयानमार्गाने मोक्ष मिळून पुनर्जन्म प्राप्त होत नाही आणि पितृयाण मार्ग स्वर्गप्रद असला तरी मोक्षप्रद नाही असे जाणिलें, तो अर्थातच यांपैकी आपल्या ख-या कल्याणाचा मार्ग स्वीका- रील, मोहाने खालच्या पायरीच्या मार्गात पडणार नाही हे उघड आहे; आणि याच गोष्टीस अनलान " या देन सृती ह्मणजे मार्ग (तत्त्वत:) जाणणारा " हे शब्द पहिल्या श्लोकांत आले आहेत. देवयान आणि पितयाण या दोन वाटापैकी कोणती कोठे जात्ये हे कर्मयोग्याला कळत असते. व त्यामुळे कोणती वाट उत्तम तीच तो स्वभावतः स्वीकारितो आणि स्वर्गाच्या येरजान्या टाळून त्यापलीकडच्या मोक्षपदाची प्राप्ति करून घेत असतो असा या श्लोकांचा भावार्थ आहे; आणि २७ व्या श्लोकांत अर्जुनाला त्याप्रमाणे वागण्याचा उपदेशहि केला आहे.] याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाइलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदांत ब्रह्मविद्यान्तर्गत योग- म्हणजे कर्मयोग-शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतील अक्षरब्रह्मयोग नांवाचा आठवा अध्याय समाप्त झाला. - - --- - - - - -