पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १४९ यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥२०॥ अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् । यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ २१ ॥ पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया । यस्यांतःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्॥२२॥ $ यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः। (२०) पण या वर सांगितलेल्या अव्यक्तापलीडचा दुसरा सनातन अव्यक्त पदार्थ, जो सर्व भूते नाहीशी झाली तरीहि नाहीसा होत नाही,(२१) ज्या अव्यक्ताला 'अक्षर ' असें (-हि) म्हणतात, तोच परम म्हणजे उत्कृष्ट किंवा अखेरची गति म्हटली आहे; (व) ज्याला जाऊन पोचले असतां फिरून (जन्मास ) येत नाही ( असें ) माझे परमस्थान (ही) तेच होय. (२२) हे पार्था ! ज्याच्या आंत (सर्व) भूते आहेत व ज्याने हे सर्व विस्तारिलें किंवा व्यापिलें आहे तो पर म्हणजे श्रेष्ठ पुरुष अनन्यभनीच लभ्य होय.

[वीस व एकवीस श्लोक मिळून एक वाक्य आहे, पैकी विसाव्या

श्लोकांतील 'अव्यक्त' हा शब्द प्रथम सांख्याच्या प्रकृतीस, म्हणजे १८ व्या श्लोकांतील अध्यक्त द्रव्यास अनुलक्षून योजिला असुन तोच पुढे सांख्याच्या प्रकृतीपलीकडच्या परब्रह्मासहि लाविला आहे. आणि या दुसऱ्या अध्यक्तासच 'अक्षर' असेंहि म्हणतात असे २१ व्या श्लोकांत म्हटले आहे; तसेंच अध्यायाच्या आरंभीहि " अक्षरं ब्रह्म परम " असे वर्णन आहे. सारांश, ' अव्यक्त' या शब्दाप्रमाणेच 'अक्षर' शब्दा- चाहि गीतेत दोन प्रकारे उपयोग केलेला आहे. सांख्यांची प्रकृतिच अव्यस्त व अक्षर आहे असे नाही. तर " सर्व भूते नाहीशी झाली तरीहि जो नाहीसा होत नाही" तो परमेश्वर किंवा ब्रह्महि अक्षर अव्यक्त आहे. पंधराव्या अध्यायांत पुरुषोत्तमलक्षण सांगताना तो क्षर व अक्षर यांपलीकडचा आहे असें में वर्णन आहे त्यांतील 'अक्षर' - - - - -