पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय .. १७९ अधियक्षः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन । प्रयाणकाले च कथे शेयोऽसि नियतात्मभिः ॥२॥ १.१२,१३). सारांश, अधिदैवत, अधिभूत, अध्यात्म इ. भेद प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत, आणि परमेश्वरस्वरूपाच्या या निरनिराळ्या कल्पनांपैकी खरी कोणती अगर स्यांतील तथ्य काय हा प्रश्नहि तेव्हाच निघालेला असून सर्व भूतांत, सर्व देवतांत, सर्व आध्यात्मांत, सर्व लोकांत, सर्व यज्ञांत सर्व देहांत अंतर्यामी व्यापून राहून त्यांना न समजताहि त्यांना खेळविणारा एकच परमात्मा आहे असे बृहदारण्यकोपनिषदांत याज्ञवल्क्याने उद्दालक आरुणीस सांगितले आहे (बृ. ३. ४) उपनिषदांचा हाच सिद्धान्त वेदान्तसूत्रांच्या अंतर्याम्यधिकरणांत स्वीकारिला असून (के. सू. १. २. १८-२०), तेथेच सर्वान्तर्यामी असणारे हे तत्त्व, सांख्यांची प्रकृति अगर जीवास्मा नसून परमात्मा आहे असे सिद्ध केले आहे. याच सिद्धान्ताच्या अनुरोधाने मनुप्याच्या देहांत, सर्व भूतांत (अधिभूत), सर्व यज्ञात ( अधियज्ञ, सर्व देवतांत (अधिदैवत), सर्व कर्मात, आणि सर्व वस्तूंच्या सुक्ष्म (म्हणजे अध्यात्म) स्वरूपांत, एकच परमेश्वर भरला असून देवता, यश इत्यादिनानात्व किंवा विविध प्रकारचे ज्ञान खरे नाही, असें भगवान आता अर्जुनास सांगत आहेत. सातव्या अध्यायाच्या अखेर अधिभूतादि जे शब्द भगवंतांनी उचारिले, त्यावरून अर्जुनास त्यांचा अर्थ जाणण्याची इच्छा होऊन तो प्रथम असे विचारतो की-] अर्जुन म्हणाला--(1) हे पुरुषोत्तमा ! तें ब्रह्म झणजे काय? अध्यात्म हणजे काय? कर्म म्हणजे काय ? अधिभूत कशाला म्हणावयाचे? आणि अधिदैवत कशाला मणतात? (२) अधियज्ञ कसा असतो ? आणि या देहांत हे मधुसूरना ! कोण ( अधिदेह) आहे? आणि इंद्रियनिग्रह करणारे अंतकाळी तुम्हांस कसे ओळखतात? (हे मला सांगा),