पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥ १॥ क्याचा हा सिद्धान्त ठरविला आहे. ह्मणून पूर्वपक्षाचा जेव्हा विचार कराव- याचा असतो तेव्हा प्रत्येक पदार्थाचे सुक्ष्म स्वरूप किंवा आस्मा निरनिराळा आहे असे मानितात; जाणि हाच अर्थ प्रकृतस्थली अध्यात्म शब्दाने अभिप्रेत आहे. अध्यात्म, अधिदैवत व आधभूत-दृष्टया एकाच विवेचनाचे याप्रमाणे भिन्नभिन्न प्रकार कसे होतात, हे महाभारतात मनुष्यांच्या इंदियांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे म. भा. शां. ३१३, व अश्व, ४१ पहा). महाभारतकार असे ह्मणतात की, मनुष्याच्या इंद्रियांचे विवेचन अधिभूत अध्यात्म व अधिदैवत, असे तीन प्रकारे करिता येते. या इंद्रियांनी ग्राह्य जे विषय-उदाहरणार्थ, हाताने जे घ्यावयाचे, कानाने जें ऐकावयाचे, डोळ्यांनी जे पहावयाचे किंवा मनाने ज्याचें चिंतन करावयाचे, तें सर्व अधिभूत; आणि हस्तपादादिकांचे (सोल्यशास्त्रोक्त) जे सूक्ष्म स्वभाव ह्मणजे सूक्ष्म इंद्रिये, ती सदर इंद्रियांची अध्यारमें होत. पण या दोन्ही दृष्टि सोडून अधिदैवत दृष्टीने विचार केला झणजे हातांची देवता इंद्र, पायांची विष्ण, गदाची मित्र, उपस्थाची प्रजापति, वाणीची अग्नि, डोळ्यांची सूर्य, कानाची दिशा किंवा आकाश, जिव्हेची पाणी, नाकाची पृथ्वी, त्वचेची वायु, मनाची चंद्र, अहंकाराची बुद्धि आणि बुद्धीची देवता पुरुप, असे मानून याच देवता त्या त्या इंद्रियांचे व्यापार चालवितात, असें म्हणत असतात. उपनिषदांतहि उपासनेसाठी ब्रह्मस्वरूपाची जी प्रतीके वणिली आहेत त्यांत मन हे अध्यात्म आणि सूर्य किंवा आकाश हे अधिदैवत हा प्रतीक होय, असे म्हटले आहे (छां, ३.१८.१). अध्यात्म व अधिदैवत हा मेव केवळ उपासनेसाठीच केलेला आहे असें नाही; तर वाणी, चक्षु, श्रोत्र इत्यादि इंद्रिये व प्राण यांपैकी श्रेष्ठ कोण या प्रश्नाचा विचार एकदा वाणी, चक्षु व श्रोत्र ही सूक्ष्मेद्रिय घेऊन अध्यारम दृष्टया, आणि एकदा स्या इंद्रियांच्याच आग्नि, सूर्य व आकाश या देवता घेऊन अधिदेवताया उपनिषदातून केलेला आहे (पृ. ६.५.२१-२३, छां. 1. २-३, कौषी.