पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ८. १७७ अर्जुन उवाच । किं तद्ब्रह्म किमध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम । पूजन होते. तिसरे असे म्हणतात की, सृष्टीतील व्यापार जड पदार्थ स्वतः करीत नाहीत, तर त्यापैकी प्रत्येकांत कोणी तरी सचेतन पुरुष किंवा देवता वास करीत असून, त्या देवता हे व्यवहार करीत असतात, आणि त्यामुळे त्या देवतांचे आराधन आपणांस केले पाहिजे. उदाहरणार्थ, सूर्य या जर पांचभौतिक गोळयांत सूर्य या नांवाचा जो पुरुप तोच प्रकाश देण्याचे वगैरे काम करीत असून तोच उपास्य होय. चवथ्या पक्षाचे म्हणणे असें आहे की, प्रत्येक पदार्थात त्या पदार्थाहून भिन्न अशी देवता वास करीत असते असे मानणे युक्त नाही. मनुष्याचे शरीरांत जसा आस्मा स्याप्रमाणे प्रत्येक वस्तूच्या ठायीं त्याच वस्तूचे काही तरी सूक्ष्म रूप म्हणजे आत्म्यासारखो सक्षम शक्ति पास करीत असून तेच त्या वस्तूचे मूळांतले व खरे स्वरूप होय, उदाहरणार्थ, पंच स्थूल महाभूतांत पंच सूक्ष्म तन्मात्रे, आणि हस्तपा- दादि स्थूलेंद्रियांत सूक्ष्म इंद्रिये मूलभूत असतात. प्रत्येक मनुष्याचा आस्माहि निरनिराळा असुन पुरुष असंख्य आहेत असे जे सांख्यांचे मत ते याच चवथ्या तत्त्वावर अवलंबून आहे; पण प्रकृतस्थली या सांख्यमताचा अधिदेह' या वर्गात समावेश केलेला दिसतो. या चार पक्षांपच अनुक्रमे अधिभूत, अधियज्ञ, अधिदेवत व अध्यात्मक अशी नावे आहेत. अधि' हा उपसर्ग कोणत्याहि शब्दांच्या मागे असला म्हणजे ' तमधिकृत्य,' 'तद्विषयक,' 'स्या बाबतीतले, ' किंवा 'स्याचे ठायीं असणारे,' असा अर्थ होतो. या अर्थाप्रमाणे अधिदैवत झणजे अनेक देवतांचे ठायी असणारे तत्व होय. अध्यात्म याचा सामान्य अर्थ " एकच आत्मा सर्व ठिकाणी आहे असे प्रतिपादन करणारे शास्त्र" असा आहे. पण हा अर्थ सिद्धान्तपक्षाचा आहे. म्हणजे अनेक वस्तूंत किंवा मनुष्यांतहि अनेक आरम आहेत असा जो पूर्वपक्ष त्याची शहानिशा होऊन वेदान्तशास्त्राने आ मै- गी.११