पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. । देखील " हे शेवटच्या श्लोकांतील शब्द आहेत; तथापि मरणापूर्वी परमेश्वराचे पूर्ण ज्ञान झालेले असल्याखेरीज केवळ अंतकाळीच है ज्ञान होणे शक्य नाहीं हैं शेवटच्या श्लोकांतील 'देखील' या पदाने स्पष्ट होते (गी. २. ७२ पहा). जास्त खुलासा पुढील अध्यायांत केलेला आहे. अधिभूतादि शब्दांनी पुढील अध्यायाची प्रस्तावनाच या दोन श्लोकांत केलेली आहे असे म्हटले तरी चालेल ? याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाइलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदांत ब्रह्मविद्यान्तर्गत योग-म्हणजे कर्मयोग-शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतील ज्ञानविज्ञानयोग नांवाचा सातवा अध्याय समाप्त झाला. अष्टमोऽध्यायः । अध्याय आठवा. [कर्मयोगान्तर्गत ज्ञानविज्ञानाचे निरूपण या अध्यायांत पुढे चालू असून, ब्रहा, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ असे जे मागील अध्यायाच्या शेवटी परमेश्वरस्वरूपाचे विविध प्रकार सांगितले त्यांचा अर्थ सांगून स्यांतील तथ्य काय याचे प्रथम विवेचन आहे. परंतु हे विवेचन सदर शब्दांच्या केवळ व्याख्या देऊन म्हणजे अत्यंत संक्षिप्त रीतीने केलेले असल्यामुळे या विषयाचा या अवतरणांत थोडा जास्त खुलासा करणे जरूर आहे. बाम सृष्टीच्या अबलोकनावरून सृष्टीच्या काची कल्पना अनेक लोक अनेक रीतींनी करीत असतात. कोणी असें म्हणतात की, सृष्टी. तील सर्व पदार्थ पंचमहाभूतांचेच विकार असून या पंचमहाभूतांखेरीज मूळांत दुसरे कोणतेंहि तत्व नाही. दुसरे कित्येक असे प्रतिपादन करितात की, गीतेच्या चवथ्या अध्यायांत वर्णिल्याप्रमाणे हे सर्व जग यशापासून झालेले आहे, म्हणून परमेश्वर यज्ञनारायणरूपी असून यानेच त्याचे