पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १. पश्यैतां पांडपुत्राणामाचार्य महतीं चमूम् । व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ ३॥ अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि । युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ ४॥ घटकेतश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान । पुरुचित्कुंतिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः ॥ ५ ॥ युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् । सौभद्रो द्रोपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥ ६ ॥ पूर्वीच्या अध्यायांत वर्णन आहे (म.भा. भी. १९.४-७; मनु.७.१९१). युद्धांत पुढे दररोज हे व्यूह बदलत असत. ] (३) आचार्य ! तुमचा बुद्धिमान् शिष्य दुपदपुत्र (धृष्टद्युम्न) याने जिचा व्यूह रचिला आहे अशी पांडुबत्रांची ही मोठी सेना पहा. (४) यांत शूर, महाधनुर्धर, आणि युद्धांत भीमार्जुनांसारखे (असे) युयुधान (सात्याकि) विराट आणि महारथी दुपद, (५) धुष्टकेतु, चेकितान व वीर्यवान् काशिराज, पुरुजित् कुंतिभोज आणि नरश्रेष्ठ शब्य. (६) तसाच पराक्रमी युधामन्यु व वीर्यशाली उत्तमौजा, आणि सुभद्रेचा पुत्र (अभिमन्यु) द्रौपदीचे (पांच) पुत्र, हे सर्वच महारथी आहेत. दहा हजार धनुर्धारी योद्धयांबरोबर जो एकटाच युद्ध करू शकतो. त्याला महारथी म्हणतात. दोन्ही बाजूंच्या सैन्यांत कोणकोणते रथी, महारथी, किंवा अतिरथी होते यांचे वर्णन उद्योगपवाच्या १६५ ते १७१ या आठ अध्यायांत केलेलं आहे. सृष्टकेतु हा शिशुपालाचा मुलगा होता अमें स्यांत म्हटले आहे. तसेच पुरुजित कुतिभोज ही दोन पुरुषांची दोन नावे नव्हेत, कुंती ज्या कुंतीभोज राजाला दत्तक दिली होती, त्याचा पुरु- जित् हा औरस मुलगा असून कुंतिभोज हे त्याचे कुळनांव आहे; व धर्म,