पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन। भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ २६ ॥ इच्छाद्वेषसमुन्थन द्वंद्वमोहेन भारत ! । सर्वभूतानि संमोहं संर्गे यान्ति परंतप ॥ २७ ॥ आणि या बाबतींत ज्या नामरूपात्मक मायेने अव्यक्त परमेश्वर व्यक्त मानिला जातो ती माया.-मग तिला अलौकिक शक्ति म्हणा किंवा दुसरे काही म्हणा-'अज्ञानाने ' उत्पन्न झालेली दिखाऊ वस्तु अगर 'मोह' असून खरे परमेश्वरतत्त्व स्याहून निश आहे, असा अद्वैत वेदान्ताप्रमाणेच गीतेचाहि सिद्धान्त आहे, हे वरील श्लोकावरून उघड होतें. एरवीं 'अबुद्धि' किंवा 'मूढ' ही पदे घालण्याचे काही कारण दिसत नाही. सारांश माया सत्य नसुन एक परमेश्वरच सत्य होय. पण या मायेने भुलून गेल्यामुळे लोक अनेक देवतांच्या नादी लागत असतात असे गीतेचे झणणे आहे. बृहदारण्यकोपनिषदांत (अ. १. १. ४.१०) याचप्रमाणे वर्णन असन, जे लोक आत्मा व ब्रह्म एकच आहे हे न ओळखितां भेदभावाने भिन्न देवतांच्या नादी लागतात ते 'देवांचे पशु' होत, म्हणजे गवादि पशू पासून मनुष्यास जसा फायदा होतो तसा या अज्ञानी भक्तांपासून देवतांचा मात्र फायदा होतो, त्यांच्या भक्तांस मोक्ष मिळत नाही, असें झटले आहे. मायेंत गुंतून अनेक देवतांची भेदभावाने उपासना करणारांचे हे वर्णन झाले; आतां या माथेतून सुटका कशी होत्ये ते सांगतात-] (२६) भूत, वर्तमान व भविष्य (काळी झालेली, असणारी व होणारौं) सर्व भूते म्हणजे प्राणी मी जाणितो; पण हे अर्जुना ! मला कोणीहि जाणीत नाही. (२७) कारण हे भारता! (इंद्रियांच्या) इच्छा व द्वेष भांपासून उनवणान्या (सुखदुःखादि) इंद्वारया मोहाने सर्व भूते परंतपा!