पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ७. १६७ $$ विभिर्गुणमयीवरेभिः सर्वमिदं जगत् । - मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥ १३ ॥ परमश्वरापासून निघाले असून मण्यांतल्या दोन्याप्रमाणे या पदार्थातील गुणधर्महि जरी परमेश्वरच आहे तरी परमेश्वराची व्याप्ति तेवढ्याने न संपतां त्यांना व्यापून पलीकडेहि तोच परमेश्वर आहे असे समजले पाहिजे; आणि हाच अर्थ पुढे " हे सर्व जग मी एकांशाने व्यापून राहिलो आहे" (गी. १०,४२) या श्लोकांत वर्णिला आहे. पण या अर्था- खेरीज दुसराहि अर्थ नेहमीच विवक्षित असतो. तो हा की, त्रिगुणात्मक जगांतील नानात्व जरी मजपासून निर्माण झालेले दिसते, तरी ते नानात्व माझ्या निर्गुण स्वरूपांत रहात नाही; आणि हा दुसरा अर्थ मनांत आणून “भूतभत् न च भूतस्थः” (९, ४ व ५) इत्यादि परमेश्वराच्या अलौकिक शक्तीची पुढे वर्णने आहेत (गी. १३.१४-१६). परमेश्वराची व्याप्ति याप्रमाणे जर सर्व जगाहूनहि अधिक आहे, तर खरें परमेश्वर- स्वरूप ओळखण्यास या मायिक जगाच्याहि पलीकडे गेले पाहिजे हे उघड होते; व तोच अर्थ आतां स्पष्टपणे प्रतिपादन करितात- (१३) (सत्व, रज व तम या) तीन गुणात्मक भावांनी हा पदा- र्थानी मोहित होऊन हे सर्व जग, यांच्या पलीकडचा (अर्थात् निर्गुण) जो मी अव्यय (परमेश्वर) स्या मला, जाणीत नाही. माया किंवा अज्ञान हे त्रिगुणात्मक देहेंद्रियाचा धर्म आहे, आत्म्याचा नाही, आरमा ज्ञानमय व नित्य असून स्याला इंद्रिये भ्रमात पाडतात, असा जो मायेसंबंधाने गीतारहस्याच्या ५ व्या प्रकरणांत सिद्धान्त दिला आहे तोच अद्वैती सिद्धान्त वरील श्लोकांत सांगितला आहे. गीता ७.२४व गीतार. प्र. ९ पृ. २३४-२४५ पहा.] - - - - - - - - - - - - --