पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ श्रीमद्भगवद्गीता. संजय उवाच । 5 दृष्ट्वा तु पांडवानीकं न्यूढं दुर्योधनस्तदा । __ आचार्यमुपसंगम्य गाजा वचनमब्रवीत् ॥ २॥ प्रतीत भीष्मपर्वाच्या २५ ते ४२ अध्यायांत ही गीता गोविलेली आहे. या परंपरेप्रमाणे- धृतराष्ट्र म्हणाला-(१) संजया ! कुरुक्षेत्राच्या पुण्यभूमीत एकच जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या युद्धेच्छु पुनांनी काय केले? कुरुक्षेत्र म्हणजे हस्तिनापूरच्या सभोवारचे मैदान होय. हल्लीचें दिल्ली शहर या मैदानावरच आहे. कौरपांडवांचा पूर्वज कुरु नांवाचा राजा या मैदानांत नांगर धरून कष्टाने ते नांगरीत होता, म्हणून त्याला क्षेत्र ( किंवा शत) असे म्हणतात, पुढे इंद्राने या क्षेत्रांत जे तप करीत किंवा युद्धांत मरतील त्यांस स्वर्गप्राप्ति होईल असा कुरूस वर दिल्यावर त्याने हे क्षेत्र नांगरण्याचे सोडून दिले, अशी भारतांत कथा आहे (म. मा. शल्य. ५३.) इंद्राच्या या वरामुळेच या क्षेत्रास धर्मक्षत्र किंवा पुण्यभूमि असे म्हणू लागले. याच मैदानावर परशुरामाने एक- वीस वेळां पृथ्वी निःक्षत्रिय करून पितृतर्पण केले अशी कथा असून, अर्वाचीन कालीहि या क्षेत्रावर मोठमोठ्या लढाया झालेल्या आहेत.] संजय म्हणाला-(२) त्या वेळी पांडवांचे सैन्य व्यूह रचून ( उभे) राहिले आहे असे पाहिल्यावर दुर्योधन राजा (द्रोण ) आचार्याजवळ जाऊन असें भाषण करिता झाला की,-- कौरवांच्या सैन्याचा म्यूह प्रथम भीष्मांनी रचिल्यावर पांडवांचे सैन्य कौरवांपेक्षा कमी असल्यामुळे त्यांनी युद्धशास्त्राप्रमाणे आपले सैन्य वन नांवाचा म्यूह रचून उभे केले होते असे महाभारतांतील गीतेच्या