पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ७. १६५ प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥८॥ पैकी पांच स्थूल भूते, व दहा इंद्रिय व मन ही सोळा बाकी राहि- लेल्या सात तरवांपासून निघालेली म्ह. त्यांचे विकार होत. म्हणून " मूळ तत्त्वे" किती याचा विचार करतेवेळी ही सोळा तर सोडून देतात; व ती सोडून दिली म्हणजे बुद्धि (महान् ) अहंकार व पंचतन्मात्रै (सूक्ष्म भूर्ते) मिळून सातच मूळ तत्वे शिल्लक रहातात. या सातांसच सांख्यशास्त्रांत 'प्रकृति-विकृति' अशी संज्ञा आहे. या सात प्रकृति-विकृति व मूळ प्रकृति मिळून आतां आठच प्रकारची प्रकृति होत्ये; व महाभारतांत (शो ३३०. १०-१५) यासच अष्टधा प्रकृति असे म्हटले आहे. पण सात प्रकृति-विकृतींबरोबरच मूळ प्रकृतीची गणना करणे गीतेस योग्य वाटले नाही. कारण तसे केले तर एक मूळ व त्याचे सात विकार हा भेद दाखविला जात नाही. म्हणून सात प्रकृति- विकृत्ति व मन मिळून अष्टधा मूळ प्रकृति होय असा गीतेच्या वर्गी- करणांत व महाभारतातल्या वर्गीकरणांत थोटा भेद केलेला आहे (गीतार. पृ. १८०). सारांश, सांख्यांची स्वतंत्र प्रकृति गीतेस कबूल नाही, तरी पुढील विस्ताराचे निरूपण दोहोकडे वस्तुत: एकच आहे हे लक्षात ठेविले पाहिजे. गीतेप्रमाणे उपनिषदांतह परब्रह्मापासूनच सामान्यत:- एतस्माज्जायते प्राणो मनः सर्वेद्रियाणि च । खं वायुज्योतिरापः पृथिवी विश्वस्य धारिणी । "या (परपुरपा)पासून प्राण, मन, सर्व इंद्रिये, आकाश, वायु, अग्नि, पाणी व विश्वाला धारण करणारी पृथ्वी ही (सर्व) उत्पन्न होतात"- असे वर्णन आहे (मुंड, २.१.३ के.१.१५, प्रभ. ६.४). जास्त माहि- तीसाठी गीतारहस्य प्रकरण ८ पहा. पृथ्वी, आप, वगैरे पंचतत्वे मीच