पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥४७॥ इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन- संवादे ध्यानयोगो नाम षष्टोऽध्यायः ॥ ६ ॥ । कर्मयोगांतहि भक्तीच्या प्रेमळपणाची भर पडल्यास दुधात साखर पडल्याप्रमाणे ती योगी भगवंतास अत्यंत प्रिय होतो असे या श्लोकाचे तात्पर्य आहे. निष्काम कर्मयोगापेक्षाहि भक्ति श्रेष्ठ असा अर्थ नाही. कारण पृढे बाराव्या अध्यायांत ध्यानापेक्षा कर्मफलत्याग श्रेष्ठ असें भगवंतांमीच स्पष्ट झटले आहे. (गी. १२.२२) निष्काम कर्म व भफि यांचा समश्चय श्रेष्ठ है झणणे निराळे, आणि सर्व निष्काम कर्म- योग व्यर्थ असून भक्ति श्रेष्ट ह ह्मणणे निराळे. गीतेचा सिद्धान्त पहिल्या प्रकारचा असून भागवतपुराणाचा पक्ष दुसन्या प्रकारचा आहे. सर्व प्रकारचे क्रियायोग आत्मज्ञानविघातक (भाग, १.५,३४) भवून- नैष्कर्म्यमप्यच्युतभावजितं न शोभते ज्ञानमलं निरंजनम् । वैष्कर्य ह्मणजे निष्काम कर्महि (भाग. ११.३.४६) भगवद्भक्तीवांचून शोभत नाही, फुकट आहे (भाग. १.५.१२ व १२.१२.५२), असे भागवताच्या पहिल्या व शेवटच्या स्कंधांतहि पुनः म्हटले आहे. भागवतकारांचा कटाक्ष केवळ भक्तीवरच असल्यामुळे प्रसंगविशेषी भगवद्गीतेच्याहि पुढे ते कशी धांव घेत असतात हे यावरून व्यक्त होईल. महाभारतांत, व अर्थात् गीतेतह, भक्तीचे वर्णन वहावयास पाहिजे तसे झाले नाही अशा समजुतीने में पुराण निरूपिले गेले, स्यांत वरच्यासारखी दुसरीहि काही विधाने सांपडल्यास त्यांत काही सबल नाही. पण आह्मांला गीतेचे तात्पर्य काय हे पहावयाचे आहे. भागवत काय सांगते ते पहावयाचे नाही. दोहोंचे प्रयोजन व कालहि