पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ६. १५७ योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना।। मीमांसक, किंवा ज्ञानमार्गी या प्रत्येकापेक्षां कर्मयोगी श्रेष्ठ आहे. स्हणूनच मागें 'योगस्थ होऊन कम कर' (गी, २.४८, गीतार. पृ. ५८), किंवा " योगाचा आश्रय करून ऊठ" (४.४२). असा ज्याप्रमाणे अर्जुनास उपदेश केला आहे, तद्वत् येथेहि " तूं (कर्म) योगी हो' असा पुनः स्पष्ट अपदेश आहे. आणि कर्मयोग याप्रमाणे श्रेष्ठ न मानिला तर " तस्मात् तुं योगी हो" या उपदेशांतील तस्मात् म्हणून ' हे पद निरर्थक होईल. पण संन्यासमार्गीय टीका- कारांस हा सिद्धांत कसा खपणार ? म्हणून 'ज्ञानी ' या पदाचा अर्थ । फिरवून ज्ञानी म्हणजे केवळ शब्दज्ञान किंवा पुस्तकी ज्ञान झालेले लोक असा त्यांनी अर्थ केला आहे. पण हा अर्थ निवळ सांप्रदायिक आग्रहाचा होय. कम सोदणारा ज्ञानमार्ग गीता कमी समजल्ये असा गीतेचा अर्थ या टिकाकारांस नको आहे. कारण त्यामुळे त्यांच्या संप्रदा- यास गौणत्व येते. आणि याचसाठी 'कर्मयोगी विशिष्यते' (गी. ५२) याचाहि अर्थ त्यांनी किरविला आहे. पण याचा पूर्ण विचार गीतारह- स्याच्या ११ व्या प्रकरणांत (पृ. ३०४ वगरे) केला असल्यामुळे या श्काच्या आम्ही दिलेल्या अर्थाबद्दल येथे जास्त चर्चा करीत नाही) कर्मयोग हाच मार्ग गीतेप्रमाणे सर्वात श्रेष्ठ होय एक्. आमच्या मते निर्विवाद आहे आतां कर्मयोग्यांतहि कोणता तारतम्यभाव पहावा लागतो हे पुढील श्लोकांत सांगतात---] (४७) तथापि सर्व (कर्म-) योगामध्येहि जो माझ्या ठिकाणी अंतःकरण ठेवून श्रद्धेने मला भजतो, त्यालाच मी सर्वांत उत्तम युक्त ह्मणजे उत्तम सिद्ध झालेला कर्मयोगी समजतो. - - - - - - -- - - --