पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥४६ ।। ब्रह्माच्या पलीकडच्या ब्रह्मास पोचल्याखेरीज रहात नाही. जनकादिकांस ही सिद्धि एकाच जन्मांत मिळाली असें सकृद्दर्शनी वाटते खरे; पण तस्वतः पहातां त्यांनाहि हे फल जन्मोजन्मींच्या पूर्वसंस्कारानेच मिळाले असले पाहिजे, हे विसरता कामा नये. असो; कर्मयोगाचे थोडेसे आचरण, किंबहुना जिज्ञासा देल, अशा रीतीने नेहमीच कल्याणका- रक असून शिवाय त्यानेच अखेरीस मोक्षप्रातिहि निःसंशय होत अस- ल्यामुळे भगवान् आतां अर्जुनास असे सांगतात की--] (४३) तपस्वी लोकांपेक्षा (कर्म-) योगी श्रेष्ठ, ज्ञानी पुरुषांपेक्षाहि श्रेष्ठ, आणि कर्मठापेक्षाहि श्रेष्ठ समजतात; तस्मात् हे अर्जुना ! तूं योगी म्हणजे कर्मयोगी हो. । या श्लोकांत तपस्वी म्हणजे अरण्यांत जाऊन उपोषणादे कायक्केश कर व्रतांनी किंवा हठयोगांतील साधनांनी सिद्धि मिळविणारे लोक असा अर्थ असून सामान्यतःहि या शब्दाचा अर्थ हाच आहे. ज्ञानी म्हणजे अर्थातच "ज्ञानयोगेन सांख्यानां " (गी. ३.३.) यांत वर्णिलेले ज्ञानाने झणजे सांख्यमार्गाने कम सोडून सिद मिळविणारे सांत्यनिष्ट लोक होत. तसेंच कर्मी ह्यणजे गी. २.४२-४४ आणि १.२०.२१ यांत वर्णिलेले नुस्ती काम्य कर्मे करणारे स्वर्गपरायण कर्मठ मिमौसक होत. या तीन पंथापैकी प्रत्येकजण आपआपल्या मार्गानेच सिद्धि मिळत्ये असें म्हणत असतो. पण गीता आतां असें सांगत आहे की, तपस्वी ध्या, कर्मठ मिमांसक घ्या, किंवा ज्ञाननिष्ट घ्या, या प्रत्येकापेक्षा कर्म. योगी-अर्थात् कर्मयोग हा मार्गहि-प्रेष्ट आहे. आणि तोच सिद्धान्त पूर्वी " अकविक्षा कर्म श्रेष्ट" (गी. ३.८) आणि "कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग विशेष." (गी. ५.२). इत्यादी श्लोकांत वर्णिला आहे (गीतारहस्य प्रकरण ११ पृ. ३०४,३०५ पहा). किंबहुना तपस्थी,


- - -