पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. तत्र तं बुद्धीसंयोग लभते पौर्वदेहिकम् । यतते च ततो भूयःसंसिद्धौ कुरुनंदन ॥४३॥ पूर्वाभ्यासेन तेनैव हियते धवशोऽपि सः। जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥ ४ ॥ प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः । अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ।। ४५।। बुद्धिमान् अशा (कर्म-) योग्यांच्याच कुळांत जन्म पावतो. अशा प्रकारचे जें जन्म ते (या) लोकी मोठे दुर्लभ होय. (४३) यांत म्हणजे अशा प्रकारे प्राप्त झालेल्या जन्मांत पूर्वजन्मांतला तो बुद्धिसंस्कार त्याला प्राप्त होतो; आणि हे कुरुनंदना ! तो त्याहून भूयः म्ह० अधिक (योग.) सिद्धि मिळविण्याचा प्रयत्न करतो. (४४) पूर्वजन्मींच्या त्याच्या त्या अभ्यानानेच अवश्य म्हणजे स्वतः इच्छा नसली तरी तो (पूर्ण सिद्धीकडे) ओढला जातो. ज्याला ( कर्म-) योगाची जिज्ञासा म्हणजे ज्ञान व्हावे अशी इच्छा झाली, तो देखील शब्दब्रह्माच्या पलीकडे जातो. (५५) (याप्रमाणे) प्रयत्नाने उद्योग करितां करितां पापपासून शुद्ध होत्साता (कर्म-) योगी अनेक जन्मानंतर सिद्धि पावून अखेर उत्तम गीत पोचतो! । [या श्लोकांतून योग, योगभ्रष्ट व योगी हे शब्द कर्मयोग, कर्मयो- गापासून भ्रष्ट झालेला व कर्मयोगी या अर्थीच वापरलेले आहेत. कारण श्रीमान् कुळांत जन्मणे ही स्थिति इतरांस इष्ट असणे संभवनीय नाही. भगवान असे सांगतात की, पहिल्याने शक्य असेल तेवढ्या शुद्ध बुद्धीने कर्मयोग आचरण्यास सुरुवात करावी. थोडेच का होईना पण अशा रीसीने में कर्म करण्यांत येईल तेच या जन्मात नाही तर पुढच्या याप्र. माणे जास्त जास्त सिद्रि मिळण्यास उत्तरोत्तर कारणीभूत होऊन त्यानेच अखेरीस पूर्ण सद्दति मिळते. "हा धर्म थोडा जरी आचरिला तरी तो मोठ्या भयापासून तारतो" (गी. २.४०), आणि 'अनेक जन्मांनंतर - - - - - - - - - - - - - -