पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ६. यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया । यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ।। २० ।। सुखमात्यांतकं यत्तबुद्धिग्राह्यमतींद्रियम् । वेत्ति यत्र न वायं स्थितश्चलति तत्त्वतः ।। २१॥ यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः । यामन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ २२ ॥ तं विद्याद्दुःखसंयोगवियोग योगसंशितम् ॥ स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥२३॥ (२०) योगानुष्ठानाने निरोध होऊन चित्त ज्या ठिकाणी रममाण होते, आणि जेथे आपण आत्म्याला पाहून आत्म्यांतच संतुष्ट होऊन रहातों, (२१) जेथे (केवळ) बुद्धिगम्य व इंद्रियांना अगोचर अ जें अत्यंत सुख त्याचा त्याला अनुभव घडतो; आणि जेथें तो (एकदां) स्थिरावला म्हणजे तत्त्वापासून केव्हांहि ढळत नाही, (२२) तसेंच जी स्थिति प्राप्त झाली म्हणजे त्यापेक्षा दुसरा कोणताही लाभ स्यास अधिक वाटत नाही, आणि जेथें स्थिरावला म्हणजे कितीहि मोठे दुःख असले तरी ते (त्याला) तेथून चाळवू शकत नाही, (२३) त्याला दुःखाच्या स्पर्शापासून वियोग म्हणजे 'योग' या नांवाची स्थिति समजतात; आणि हा 'योग' मन कंटाळून देतां निश्चयाने आचरिला पाहिजे.

हे चार श्लोक मिळून एकच वाक्य आहे. त्याला' (तं) या २३

व्या श्लोकाच्या आरंभीच्या दर्शक सर्वनामाने पूर्वीच्या तीन श्लोकांतील वर्णन उद्दिष्ट आहे; आणि चारी श्ॉक मिळून समाधी'चे वर्णव पुरें केले आहे. पातंजल योगसूत्रांत " योगश्चित्तवृत्तिनिरोधः" योग ह्मणजे चित्तवृत्तीचा निरोध असे जे योगाचे लक्षण दिले आहे, तस्सदृश्य २० ध्या श्लोकाच्या आरंभीचे शब्द आहेत. या चित्तवृत्तिनिरोधाचीच समाधी ही पूर्णावस्था होय, व त्यालाच 'योग'ही संज्ञा आहे, असे