पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ६. १३५ योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ ३ ॥ म्हणून 'तस्यैव ' या पदांनी 'कर्मणः एव ' हा अर्थ घेता येत नाही; किंवा घेतलाच तर त्याचा संबंध' शमः' याशी न जोडितां" कारण- मुच्यते " याशी जोडावा म्हणजे "शम : योगारूढस्प तस्यैव कर्मणः कारणमुच्यते" असा अन्वय लागून त्याचा “शम हे योगारूढाच्या कर्माचंच आतां कारण होते " असा गीतेच्या एकंदर उपदेशास अनुस- रून नीट अर्थ लागेल. (३) टीकाकारांचा अर्थ त्याज्य मानण्याचे तिसरें कारण असे की, संन्यासमार्गाप्रमाणे योगारूढ पुरुषास पुढे काहीच करावयाचें रहात नाही, शमांतच त्याच्या सर्व कर्माचा शेवट होतो, आणि हे जर खरे तर 'योगारूढाला शम कारण होतें' या वाक्यांतील कारण' हा शब्द अगदीच निरर्थक पडतो. ' कारण' हा शब्द नेहमीच सापेक्ष आहे. कारण' म्हटले म्हणजे स्याला काही तरी 'कार्य' पाहिजे; व संन्यासमार्गाप्रमाणे योगारूढाला तर कोणतेंच 'कार्य' शिल्लक राहिलेले नसते. शम है मोक्षाचे कारण ' म्हणजे साधन म्हणावे, तर ते जुळत नाही. कारण मोक्षाचे साधन ज्ञान आहे शम नव्हे. बरे शम हे ज्ञानप्राप्तीचें 'कारण' म्हणजे साधन म्हणावें, तर योगारूढ झालेल्याचे म्हणजे पूर्णावस्थेस पोचलेल्याचे हे वर्णन असल्यामुळे त्याला ज्ञानप्राप्ति कर्माच्या साधनाने पूर्वीच झालेली असत्ये. मग शम हे 'कारण' कशाचें? संन्यासमार्गीय टीकाकारांस या प्रश्नाचे काहीच समाधानकारक उत्तर देतां येत नाही. पण त्यांचा हा अर्थ सोडून देऊन विचार करू लागले म्हणजे उत्तरार्धाचा अर्थ करि- तांना पूर्वार्धातील 'कर्म' हे पद सान्निध्यसामर्थ्याने सहज मनांत येते; आणि मग योगारूढाला स्वार्थ राहिला नसला तरी लोकसंग्रह- कारक कर्म सुटत नसल्यामुळे (गी. ३, १७-१९ पहा ) ते करण्यास शम' हे त्याला भातां 'कारण' म्हणजे साधन होते असा अर्थ