पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. $ आरुरुक्षोर्मुनर्योगं कर्म कारणमुच्यते । हा संन्यासाचे अंग म्ह० पूर्वसाधन आहे. पण हा अर्थ सांप्रदा- यिक आग्रहाचा होय; खरा नव्हे. कारण (१)कर्मफलाचा आश्रय न करितां कर्तव्यकर्म करणारा पुरुषच खरा योगी म्हणजे योगारूढ़ होय, कम न करणारा (अक्रिय) वरा योगी नव्हे, असे या अध्या- याच्या पहिल्याच श्लोकांत जर भगवंतांनी सांगितले आहे, तर तिसन्या श्लोकांत योगारूढ पुरुषाला कर्माचा शम करण्यास, किंचा कमैं सोह- ग्यास भगवान सांगतील असे मानणे सर्वथैव अन्याय्य होय. शान्ति मिळाल्यावर योगा रूढाने कमैं करूं नयेत असे संन्यासमार्गाचे जरी मत असले, तरी गीतस हैं मत मान्य नसून कर्मयोग्याने सिद्धावस्थेतहि यावजीव भगवंतांप्रमाणे निष्कामबुद्धीने सर्व कम केवळ कर्तव्ये म्हणून करीत राहिले पाहिजे, असा गीतेत अनेक ठिकाणी स्पष्ट उपदेश केला अहे (गी. २ ७१३.७ व १९, ४. १९-२१, ५.७-१२; १२.१२ १८. ५६, ५७; आणि गीतार. प्र.११ १२ पहा). (२) दुसरे कारण असे की, 'शम' या शब्दाचा 'कर्माचा शम' हा अर्थ कोठून आला ? ' शम' हा शब्द भगवट्ठींतेत दोनचारदा आला असून (गी. १०.४, १८. ४२) तेथे व प्रचारांतहि त्याचा अर्थ 'मनाची शांति' असा आहे. मग याच श्लोकांत 'कर्माची शांति ' असा अर्थ को ध्याव. याचा? ही अडचण दूर करण्यासाठी गीतेवरील पैशाचभाष्यांत 'योगा- रूढस्य तस्यैव' यांतील 'तस्यैव' या दर्शक सर्वनामाचा संबंध 'योगारूढस्य' याशी न लाविता, 'तस्य नपुसकलिंगी षष्ठी समजून “ तस्वैव कर्मणः शमः " (तस्य म्हणजे पूर्वार्धातल्या कर्माचा शम) असा अर्थ केला आहे! पण हा अन्वयहि सरळ नाही. कारण योगाभ्यास कर- णान्या ज्या पुरुषाचे वर्णन या श्लोकाच्या पूर्वार्धात केले आहे त्याचीच पुढे म्हणजे अभ्यास पुरा झाल्यावर काय स्थिति होते तो सांगण्यासाठी उत्तरार्धाचा आरंभ झाला आहे याबद्दल शंका नाही;