पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. यतेंद्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः । विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥ २८ ।। $ भोक्तारं यशतपसां सर्वलोकमहेश्वरम् । सुहृदं सर्वभूतानां शात्वा मां शान्तिमृच्छति ॥ २९ ।। इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां श्रीकृष्णार्जुन- संवादे संन्यासयोगो नाम पंचोध्यायः ।। ५ ॥ - - - - - - - - - - - - - - - आणि अपान सम करून, (२८) इंद्रिये मन व बुद्धि यांचे ज्याने संयमन केले, आणि इच्छा, भय व क्रोध ही ज्याला सुटली. तो मोक्षपरायण मनि सदासर्वदा मुक्तच म्हणावयाचा. । [ हे वर्णन जीवन्मुक्तावस्थेचे आहे असे गीतारहस्याच्या नवव्या (पृ. २३०, २४७) व दहाव्या (पृ २९६) प्रकरणावरून दिसून येईल. पण ते संन्यासमागातील पुरुषांचे आहे असें टीकाकारांचे जे म्हणणे आहे ते मात्र आमच्या मते बरोबर नाही. संन्यास व कर्मयोग या दोन्ही मार्गात शान्ति एकच असत्ये, व तेवढ्यापुरते हैं वर्णन संन्यास- मार्गास लागू पडेल; नाही असे नाही. पण या अध्यायाच्या आरंभी कर्मयोग श्रेष्ठ ठरवून नंतर पुनः २५ व्या श्लोकांत ज्ञानी पुरुष सर्व भूतांचे हित करण्यांत प्रत्यक्ष गढलेले असतात असे म्हटले आहे, स्यावरून सर्व वर्णन कर्मयोगी जीवन्मक्ताचेच आहे. संन्याश्याचे नव्हे, असे उघड सिद्ध होते ( गीता. र. प. ३७१ पहा). असो: कर्ममार्गातहि सर्वभूतान्तर्गत परमेश्वर ओळखणे हेच परमसाध्य असल्या. 'मुळे भगवान् अखेर असे सांगतात की-] (२९) (सर्व) यज्ञ व तप यांचा भोक्ता, (स्वर्गादि) सर्व लोकांचा मोठा धनी, आणि अवघ्या भूतांचा सखा, असा जो मी त्या मला (याप्रमाणे) ओळखिले ह्मणजे शान्ति पावतो.