पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः। लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा ॥ १०॥ कायेन मनसा बुद्धया केवलैरिद्रियैरपि। योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वाऽऽत्मशुद्धये ॥ ११ ॥ दोघांसहि प्राप्त आहे. पण अहंकारयुक्त आसक्त सुटली म्हणजे तींच क बंधक होत नसल्यामुळे आसक्ति सोडणे हेच काय ते यांतील मुख्य तत्व होय; व त्याचेच आतां जास्त निरूपण करितात--- (१०) ब्रह्माचे ठायीं अर्पण करून आसक्तिविरहित जो कम करितो त्याला कमळाच्या पानाला जसे पाणी त्याप्रमाणे पाप चिकटत (लागत नाही. (1) म्हणून कर्मयोगी (मी करितो अशी अहंकारबुद्धि न ठविता केवळ) शरीराने, (केवळ) मनाने ( केवळ) बुद्धीने आणि केवळ इंदि. यांनीहि आसक्ति सोडून आत्मशुद्धयर्थ कर्मे करीत असतात. कायिक वाचिक मानसिक इत्यादि कर्माचे जे भेद आहेत स्यांना अनुलक्षन शरीर, मन व बुद्धि हे शब्द या श्लोकांत आले आहेत. 'केवलै:' हे विशेपण मूळांत जरी 'इंद्रियैः' या शब्दामागे आहे तरी ते शरीर, मन व बुद्धि यांपहि लागू आहे (गी. २.४१ पहा)मणून भाषांतरांत ते 'शरीर' शब्दा- प्रमाणे इतर शब्दांच्याहि मागे घातले आहे. वर ८ व्या श्लोकांत वर्णन केल्याप्रमाणे अहंकारबुद्धि आणि फलाशेच्या ठायीं आसक्ति सांडून केवळ कायिक, वाचिक अगर केवळ मानसिक कोणतेहि कर्म केलें तभी कास त्याचा दोष लागत नाही असा अर्धे आहे. (गीता ३.२० १३.२९ व १८.१६ पहा), अहंकार नसला म्हणजे जौं कम होतात ती नुस्त्या इंद्रियांची होतात व मन आदिकरून सर्व इंद्रिय प्रकृतीचेच विकार असल्यामुळे असल्या कर्माचे बंधन कास लागत नाही, हा अर्थ शास्त्राप्रमाणे आतां सिद्ध करितात- - - - - - - - - - - - - - - -