पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ५. १२५ $ योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः । सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥७॥ नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् । पश्यन्शृण्वन्स्पशञ्जिघनश्ननाच्छन्स्वपन्श्वसन् ॥ ८॥ प्रलपन्विरजन्गृह्णन्नुन्मिपमिषन्नपि । इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ९॥ (७) जो (कर्म-) योगयुक्त झाला, ज्याचे अंतःकरण शुद्ध, ज्याने आपले मन आणि इंद्रिये जिंकली, व सर्व भूतांचा आस्मा हाच ज्याचा आत्मा झाला, तो (सर्व कम) करीत असतांहि (कर्माच्या पापपुण्यापासून ) अलिप्त असतो. (८) योगयुक्त तत्ववेत्त्या पुरुषाने " मी काहीच करीत नाही" असे समजावें; (आणि ) पाहतांना, ऐकतांना, स्पर्श करितांना, वास घेतांना, खातांना, चालतांना, निजतांना, श्वासोच्छ्रास करितांना, (९) बोलतांना, विसर्जन करितांना, घेतांना, डोळ्यांच्या पापण्या उघडतांना व मिटतांनाहि (केवळ) इंद्रिये आपआपल्या विषयांचे ठायीं वतेत आहेत अशी बुद्धि ठेवून (वागावें). । [शेवटचे दोन श्लोक मिळून एकच वाक्य असून त्यांत सांगितलेली सवै कम निरनिराळ्या इंद्रियांचे व्यापार आहेत; उदाहरणार्थ, विसर्जन करणे गुदाचा, घेणे हाताचा, पापण्या हालविणे प्राणवायूचा, पहाणे डोळ्यांचा इ०. " मी काहीच करीत नाही" याचा अर्थ इंद्रियांना हवे ते करूं घावे असा नाही; तर 'मी' ही अहंकारबुद्धि सुटली म्हणजे अचेतन इंद्रिये आपण होऊन काही वाईट काम करू शकत नाहीत, व आत्म्याच्या ताब्यांत रहातात, असा अर्थ आहे. सारांश, पुरुष ज्ञानी झाला तरी श्वासोच्छु सादि इंद्रियांची कमैं इंद्रिय करणारच. किंबहुना क्षणभर जिवंत रहाणे हे देखील कर्मच. मग संन्यासमार्गी ज्ञानी पुरुष को सोडितो व कर्मयोगी करितो हा भेद राहिला कोठे ? कर्मे करणे